Gold Silver Rate:सणासुदीपूर्वी सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या प्रमुख शहरांमधील आजचे दर
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

Gold Silver Rate: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्यानं 58,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. रविवारपासून भारतात सणासुदीचा हंगाम (फेस्टिव्ह सीझन 2023) सुरू होत आहे. अशा परिस्थितीत लोक या काळात सोन्या-चांदीची भरपूर खरेदी करतात. मात्र, त्यापूर्वीच सोन्या चांदीचे दर वाढले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये गुरुवारी सोन्याने 58,000 चा स्तर ओलांडला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सोने 58,045 रुपयांवर होते. त्यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ नोंदवण्यात आली आहे. 11 वाजेपर्यंत कालच्या तुलनेत आज सोने 154 रुपये म्हणजे 0.27 टक्क्यांनी वाढले आहे. सध्या सोन्याचा दर हा 58 हजार 94 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. काल काल वायदा बाजारात सोन्याचे दर हे 57 हजार 940 रुपये होते.
सोन्याबरोबरच चांदीही महागली
सोन्याव्यतिरिक्त, चांदीच्या किंमतीतही आज वाढ झाली आहे. वायदा बाजारात चांदीचा दर आज 69,734 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होते. यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ दिसून आली आहे. कालच्या तुलनेत चांदी 409 रुपयांनी म्हणजेच 0.59 टक्क्यांनी महाग झाली आहे. आज चांदीचे दर हे 69 हजार 835 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. काल चांदी 69,325 रुपयांवर बंद झाली.
जाणून घ्या या 10 मोठ्या शहरांमधील सोन्या-चांदीचे नवे दर
मुंबई - 24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
चेन्नई - 24 कॅरेट सोने 59,070 रुपये, चांदी 75,500 रुपये प्रति किलो
कोलकाता - 24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
दिल्ली - 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
नोएडा - 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 7,600 रुपये प्रति किलो
गाझियाबाद - 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
जयपूर - 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो
लखनौ - 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
पाटणा - 24 कॅरेट सोने 58,960 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
गुरुग्राम - 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
पुणे - 24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
गोवा - 24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 71,000 रुपये प्रति किलो
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
