Gold Silver Rate: मोठी बातमी! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांना संधी, जाणून घ्या कोणत्या शहरात दर?
सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलीय. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण (Gold Silver Rate Down) झाली आहे. त्यामुळं सोनं चांदीच खरेद करण्याची ही मोठी संधी आहे.
Gold Silver Rate Down: सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण (Gold Silver Rate Down) झाली आहे. त्यामुळं सोनं चांदीच खरेद करण्याची ही मोठी संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी सुमारे 1400 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोनेही प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या प्रत्येक शहरातील दर.
वायदे बाजारात चांदी स्वस्त
देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. (MCX वर चांदीची किंमत कमी). मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये बुधवारी चांदी 1413 रुपयांनी स्वस्त होऊन 84,254 रुपये झाली. मंगळवारी चांदी 85,658 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
सोन्याचे भावही कमी
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 300 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. काल सोन्याचा भाव 72,122 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला (सोन्याचा भाव आज घसरला). आज बुधवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाली आहे.
कोणत्या शहरात किती दर
दिल्ली - 73400 ( 24 कॅरेट)
मुंबई - 73250
चेन्नई - 73250
कोलकाता - 73250
अहमदाबाद - 73250
लखनौ - 73400
बंगळुरु - 73250
पटना - 73300
हैदराबाद - 73250
जयपूर - 73400
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदी स्वस्त
देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बुधवार, 28 ऑगस्ट 2024 रोजी, COMEX वर सोने 17.71 डॉलरने घसरले आहे. तर दुसरीकडे कोमॅक्सवर चांदी 0.55 डॉलरने स्वस्त झाली आहे.
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात घसरण
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन 6 टक्के करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात झपाट्याने घट झाली होती. कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम जवळपास 5 हजार रुपयांनी घसरून 68 हजार रुपयांच्या खाली आला होता. त्यानंतर पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली होती. सोनं 72 हजार ते 73 हजार रुपयांवर गेलं होतं. आता पुन्हा सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात घसरण, आता मात्र दरात तेजी, सोन्या चांदीचे दर वाढण्याचं नेमकं कारण काय?