एक्स्प्लोर

Gold Silver Price Today : सोन्या- चांदीचे भाव 'जैसे थे', जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today : मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,810 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,810 रुपये इतका आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलणाऱ्या सोन्या-चांदीच्या भावाने आज उसंत घेतली आहे. रविवारी मार्केट बंद होताना सोन्याच्या आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,810 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,810 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीसाठी 69,300 रुपये मोजावे लागणार आहेत.

सोन्याच्या दरात 9 जुलैला 170 रुपयांची घसरण झाली होती. त्याच्या आधी सलग आठ दिवस सोन्याच्या दरात अगदीच किरकोळ का असेना वाढ होत होती. आज सोन्याचे दर स्थिर आहेत. चांदीच्या दराचा विचार करता 7 जुलैला 600 रुपये, 8 जुलैला 1000 रुपये आणि 9 जुलैला 200 रुपयांनी चांदीच्या दरात घसरण झाली होती. तीन दिवसांच्या घसरणीनंतर 11 जुलैला पुन्हा 500 रुपयांची वाढ झाली होती. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यातील गुंतवणूक कमी
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 

गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Mutual Fund Update : सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Embed widget