(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Euro Cup Final : इटली दुसऱ्यांदा 'युरो कप' चॅम्पियन; अंतिम लढतीत पेनल्टी शूटआऊटवर इंग्लंडचा पराभव
Euro Cup Final : युरो चषक 2020 च्या अंतिम सामन्यात इटलीकडून इंग्लंडचा पराभव इटलीचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 च्या फरकानं विजय
EURO Cup Final : युरो कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटवर पराभव करून इटलीनं दुसऱ्यांदा युरो चषकावर आपलं नाव कोरलं. तब्बल 53 वर्षांच्या अंतरानं इटलीनं युरो चषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा हा मान मिळवला. विजेतेपदासाठीचा हा सामना निर्धारित वेळेत आणि त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेतही चांगलाच रंगला. सामन्याच्या अवघ्या दुसऱ्याच मिनिटाला ल्यूक शॉनं इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. इंग्लंडनं ही आघाडी 66व्या मिनिटापर्यंत टिकवली. पण 67व्या मिनिटाला इटलीला कॉर्नर किक मिळाली. याच संधीचा पुरेपूर फायदा घेत इटलीचा बचावपटू लिओनार्डो बोनुशीनं गोल डागला. त्यानंतर अखेरपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. मग पेनल्टी शूटआऊटवर इटलीनं 3-2 अशा गोलफरकानं बाजी मारली. या पराभवामुळे इंग्लंडचं पहिल्यावहिल्या युरो कप विजयाचं स्वप्न मात्र पुन्हा अधुरंच राहिलं.
युरो चषकाचा सामना अत्यंत अटी-तटीचा झाला. 120 मिनिटांपर्यंत सुरु राहिला. दोन्ही संघांकडून सामन्यात आघाडी घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र सामना बरोबरीत सुटल्यानं पेनल्टी शूटआऊटचा थरार रंगला. ज्यामध्ये इटलीनं विजय मिळवला. इटलीनं इंग्लंडचा 3-2 नं पराभव केला. इंग्लंड सलग 3 पेनल्टी स्कोर करु शकला नाही, तर इटलीनं 2 पेनल्टी चुकवल्या, मात्र 3 गोल डागले. याचसोबतच इटलीनं 1968 नंतर युरोपियन चॅम्पियनचा किताब पटकावला.
इंग्लंडचं युरो कप विजयाचं स्वप्न पुन्हा अधुरं
लंडनच्या ऐतिहासिक वेंबली स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या महाअंतिम सामन्यात इटली विरुद्ध इंग्लंड असा ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला होता. इंग्लंडचा संघ गेल्या 55 वर्षांपासून फुटबॉलचा कोणताही मोठा सामना जिंकू शकला नव्हता. अशातच युरो चषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवण्याच्या हेतूनं इटली मैदानावर उतरली होती. परंतु, पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीनं शानदार खेळी करत विजयाला गवसणी घातली. इटलीच्या विजयानंतर इंग्लंडचं युरो चषकावर नाव कोरण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :