Gold Silver Price : सोन्याचा भाव 'जैसे थे', चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार; आजचा दर काय?
Gold Silver Price : मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 46,000 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,000 रुपये इतका आहे. तर आज चांदीच्या दरात 300 रुपयांनी घट झाली आहे.

Gold Silver Price : कोरोनाच्या संकटाचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर होताना दिसत आहे. लग्नाचा सीजन असेल तर साधारणपणे सोन्या-चांदीच्या भावात वाढ होते. पण कोरोनामुळे लग्नं कमी होत असल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होत आहे. आज मुंबई आणि पुण्यामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,000 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,000 रुपये इतका आहे. तर आज चांदीच्या दरात 300 रुपयांनी घट झाली आहे.
गेले काही दिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होतं असल्याचं पहायला मिळतंय. आज, मंगळवारी सकाळी चांदीचा दर प्रतिकिलो 71,200 रुपये इतका आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 16 मे रोजी चांदीचा दर प्रतिकिलो 71000 हजार रुपये इतका होता. तर 18 मे रोजी तो प्रतिकिलो 74,000 हजारांवर पोहोचला. पुन्हा 19 मेपासून चांदीच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं. 19 मे रोजी प्रतिकिलो 73,000 रुपये, 20 मे रोजी प्रतिकिलो 72,300 रुपये, 21 मे रोजी प्रतिकिलो 71,200 रुपये, 22 मे प्रतिकिलो 71,100 रुपयांपर्यंत चांदीच्या दरात घट झाली. त्यानंतर 23 मे रोजी चांदीच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली, तर 24 मे रोजी चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली होती. आज चांदीच्या दरात 300 रुपयांनी घट झाली आहे.
गेल्या दहा दिवसांचा विचार करता सोन्याचे भाव स्थिर असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांचा विचार केला तर 20 मे रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,000 रुपये होता, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 हजार रुपये होता. त्यानंतर 21 मेपासून 25 मेपर्यंत सोन्याचे भाव स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Gautam Adani : संपत्तीच्या बाबतीत अदानी यांनी चीनची भिंत पार केली, आता अंबानींचा नंबर?
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या





















