एक्स्प्लोर

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात घसरण सुरुच, सोने 220 रुपयांनी घसरले तर चांदी 300 रुपयांनी वधारली

Gold Silver Price Today : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या मागणीत मोठी घट झाल्याने सोन्याच्या दरात गेल्या आठड्यापासून घसरण सुरु आहे. चांदीच्या घसरणीला मात्र ब्रेक लागल्याचं दिसून आलं आहे. 

मुंबई : गेल्या आठवडाभरात केवळ एका दिवसाचा अपवाद वगळता सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच आहे. आजही सोन्याच्या किंमतीत 220 रुपयांची घसरण झाली असून मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,900 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,900 रुपये इतका आहे. चांदीच्या घसरणीला मात्र ब्रेक लागला असून त्यामध्ये 300 रुपयांची वाढ झाली आहे. आता एक किलो चांदीसाठी 66,900 रुपये मोजावे लागणार आहे. 

सोन्याच्या किंमतीचा विचार करता 16 जुलैला 130 रुपये, 17 जुलैला 150 रुपये, 18 जुलैला 10 रुपये तर मंगळवारी 150 रुपयांची घसरण झाली. सलग चार दिवस सुरु असलेल्या या किरकोळ घसरणीनंतर सोन्याच्या दरात काल 260 रुपयांची वाढ झाली होती तर आज त्यामध्ये पुन्हा 180 रुपयांची घसरण झाली. 

गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 

 गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामध्ये गुंतवणूक कमी झाल्याने तसेच डॉलरचे बळकटीकरण झाल्याने सोन्याच्या किंमती तुलनेने कमीच राहिल्या आहेत.

गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही 72,600 रुपये इतकी होती. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आली. 7 जुलै रोजी चांदीच्या किमतीने पुन्हा एकदा 70 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून आलं आहे. 14 जुलैला चांदीच्या किमतीत 200 रुपयांची घसरण, 15 जुलैला 300 रुपयांची वाढ, 16 जुलैला 200 रुपयांची वाढ झाली होती. 17 तारखेला 1300 रुपयांची घसरण झाली. मंगळवारी चांदीच्या किंमतीत 600 रुपयांची घसरण झाली तर बुधवारी पुन्हा एकदा 300 रुपयांची घसरण झाली. आज त्यात 900 रुपयांची घसरण झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
Tamil Nadu : सरकारी रुग्णालयात जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी मिळणार, जोसेफ विजय सरकारनं 1 लाख 28 हजार अंगठ्यांची ऑर्डर दिली
जोसेफ विजय सरकारचा मोठा निर्णय, सरकारी रुग्णालयात जन्म झालेल्या बालकांना सोन्याची अंगठी देणार
आठ वर्ष नवऱ्याला फसवलं, गुपचूप 12 लाख वाचवलं, पण उंदरानं केला करेक्ट कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल 
आठ वर्ष नवऱ्याला फसवलं, गुपचूप 12 लाख वाचवलं, पण उंदरानं केला करेक्ट कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल 
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget