सोनं-चांदी पुन्हा महाग! सोनं 70000 रुपयांच्या पुढं, तर चांदीच्या दरात 900 रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचे दर?
सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्यानं वाढ होतेय. त्यामुळं सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ बसतेय. या वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? असा प्रश्न पडत आहे.
Gold Silver Price : सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहेत. या वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? असा प्रश्न पडत आहे. सोन्याने पुन्हा एकदा 70,000 रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर चांदीच्या दरात देखील 900 रुपयांची वाढ झाली आहे. जाणून घेऊयात आज सोन्या चांदीचे दर काय आहेत? याबाबतची सविस्तर माहिती.
भारतीय वायदे बाजारात सोन्याचा दर पुन्हा वेगाने वाढत आहे. एमसीएक्सवर शुक्रवारी (2 ऑगस्ट) सोने 546 रुपयांच्या (0.78 टक्के) वाढीसह 70,200 रुपयांच्या पातळीवर गेले होते. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. चांदीच्या दरात आज 906 रुपयांची (1.1 टक्के) वाढ झाली आहे. सध्या चांदीचा दर हा 83,500 रुपयांवर होता. परदेशी बाजारात सोन्याचा दर आठवडाभर तेजीत आहे. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वाढून 2,451 प्रति औंस डॉलरवर वर पोहोचला आहे. त्याचवेळी, यूएस गोल्ड फ्युचर्स 0.6 टक्क्यांनी वाढून 2,495 टक्क्यांवर वर होते. दरात वाढ होण्यामागे अनेक कारणे होती. सप्टेंबरमध्ये व्याजदर कपातीच्या वाढत्या शक्यतांसह मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. वाढत्या दरामुळं अनेकजण सोन खरेदीकडं पाठ फिरवताना दिसत आहेत.
सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी, तरीही सोनं महाग
अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचाी घोषणा केली आहे. त्यामुळं सोन्याच्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. तर दुसरीकडे सोन्याचे दर कमी झाल्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला होता. दरम्यान, या निर्णयानंतर सोन्याच्या दराच चांगलीच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. सोन्यावरील कस्टम ड्युटी 6 टक्के करण्याची घोषणा केली. सध्या सोन्यावरील कस्टम ड्युटीचा प्रभावी दर 15 टक्के आहे. म्हणजेच अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी 9 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चांदीवरील कस्टम ड्युटीही 15 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आली आहे. सोने-चांदीशिवाय प्लॅटिनमवरही कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.
सोन्याचे हॉलमार्क कसे तपासायचे?
सर्व कॅरेटचा हॉलमार्क क्रमांक भिन्न असतो. उदाहरणार्थ, 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे. यामुळं त्यांच्या शुद्धतेमध्ये शंका नाही.
महत्वाच्या बातम्या: