सोनं-चांदी खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? आठवडाभरात दरात किती झाली घसरण?
: गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी घसरण झाली आहे. MCX असो किंवा दिल्ली सराफा बाजार दोन्ही ठिकाणी सोन्याचे भाव 6.50 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
Gold Silver Price News : गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी घसरण झाली आहे. MCX असो किंवा दिल्ली सराफा बाजार दोन्ही ठिकाणी सोन्याचे भाव 6.50 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. त्याचवेळी चांदीच्या दरात 7 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे. त्यामुळं सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांना ही मोठी संधी आहे.
दरम्यान, दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात किंचीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. जिथे सोने 50 रुपयांनी महागले तर चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली. मात्र, गेल्या आठवडाभरात विशेषत: अर्थसंकल्पाच्या दिवशी दोन्ही धातूंच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली आहे. दुसरीकडे, दिल्ली सराफा बाजारात सोने-चांदीच्या घसरणीचे कारण म्हणजे अर्थसंकल्पातील आयात शुल्कात केलेली कपात. याच कारणामुळे गेल्या आठवडाभरात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली आहे. सोने-चांदी खरेदी करण्याची हीच वेळ योग्य असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
MCX वर सोने आणि चांदी किती स्वस्त?
19 जुलै रोजी MCX वर सोन्याचा भाव 72,990 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 26 जुलै रोजी MCX बंद झाला तेव्हा सोन्याचा भाव 68,186 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
याचा अर्थ गेल्या आठवडाभरात सोने 4,804 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त झाले आहे. म्हणजेच या कालावधीत MCX वर सोन्याच्या किमती 6.58 टक्क्यांनी स्वस्त झालं आहे.
19 जुलै रोजी एमसीएक्सवर चांदीची किंमत 89,646 रुपये प्रति किलो होती. तर 26 जुलै रोजी एमसीएक्सवर चांदीची किंमत 81,371 रुपये होती. याचा अर्थ गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात किलोमागे 8,275 रुपयांची घट झाली आहे. म्हणजेच एका आठवड्यात MCX वर चांदीच्या दरात 9.23 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
दिल्लीत सोन्याला किती दर?
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 50 रुपयांची किंचित वाढ दिसून आली आहे. तिथं सोन्याची किंमत किंमत 70,700 रुपयांवर पोहोचली. विशेष म्हणजे गेल्या एका आठवड्यात दिल्लीत सोने 6.54 टक्क्यांनी म्हणजेच 4,950 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 75,650 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. जर आपण चांदीबद्दल बोललो तर गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली आहे. मात्र, शुक्रवारी दिल्लीत चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ दिसून आली. त्यामुळे तो 84,400 रुपयांपर्यंत खाली आला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या आठवड्यातील शेवटच्या ट्रेडरमध्ये दिल्लीत चांदीचा भाव 91,600 रुपये होता. म्हणजेच या काळात दिल्लीत चांदी 7.86 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे.
महत्वाच्या बातम्या: