सोनं खरेदी करावं की नको? नवी दिल्ली ते न्यूयॉर्क जुलैमध्ये सोन्याच्या दरात किती झाली वाढ?
नवी दिल्ली (New Delhi) ते न्यूयॉर्क (New York) या ठिकाणी जुलैमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. जुलै महिन्यात आत्तापर्यंत सोन्याच्या दरात तब्बल 2700 रुपयांची वाढ झाली आहे.
Gold Price News : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येत आहे. वाढत्या दरामुळं सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं परवड नाही. नवी दिल्ली (New Delhi) ते न्यूयॉर्क (New York) या ठिकाणी जुलैमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. जुलै महिन्यात आत्तापर्यंत सोन्याच्या दरात तब्बल 2700 रुपयांची वाढ झाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
सोन्या-चांदीचे भाव विक्रमी पातळीवर
परदेशी बाजारांपासून स्थानिक बाजारपेठांपर्यंत सोन्या-चांदीचे भाव विक्रमी पातळीवर व्यवहार करताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, भू-राजकीय तणाव आणि डॉलरच्या निर्देशांकातील घसरणीमुळं सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते. भू-राजकीय तणाव आणि डॉलर निर्देशांकातील घसरणीमुळं सोने आणि चांदी तेजीत आहे. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस 2,500 डॉलरच्या जवळ पोहोचला आहे. दुसरीकडे, भारतात सोन्याचा भावही विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. जुलैचे महिन्यात सोन्याच्या किंमतीत सुमारे 2700 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 4400 रुपयांनी वाढ झाली आहे.
सोन्या चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कपासून नवी दिल्लीपर्यंत सोन्यापेक्षा चांदीने गुंतवणूकदारांना जास्त पैसा मिळवून दिला आहे. या काळात चांदीने 5 ते 6 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत विदेशी बाजारातून स्थानिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होणार आहे
भारतात सोन्या-चांदीच्या दरात किती वाढ?
जुलै महिन्यात MCX वर सोन्या-चांदीच्या किंमतीत 3.5 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. 28 जून रोजी सोन्याचा भाव 71582 रुपये होता, जो 16 जुलै रोजी 74273 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे. म्हणजेच या कालावधीत सोन्याच्या किमतीत 3.76 टक्के म्हणजेच 2691 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे 28 जून रोजी एमसीएक्सवर चांदीची किंमत 89540 रुपये प्रति किलो होती. 16 जुलै रोजी ह किंमत वाढून 93960 रुपये झाली आहे. या काळात चांदीच्या दरात तब्बल 5 टक्के म्हणजेच 4420 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. दरम्यान, सोन्या चांदीचे वाढते दर हे सर्वसामान्यांची चिंता वाढवणारे आहेत. वाढत्या दरामुळं खरेदीदारांना सोनं चांदी घेताना मोठा खर्च करावा लागत आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी सोन्या चांदीच्या खरेदीकडं लोक पाठ फिरवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: