Gold Rates Today: जन्माष्टमीपूर्वी सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त, जाणून घ्या सोन्याचांदीचे भाव
सराफा बाजारानुसार आज सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून आले असून त्याआधी सोनं साधारण 500 रुपयांनी स्वस्त झाले होते.
Gold Rates 24 August 2024: तुम्हालाही जन्माष्टमीदिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला सुवर्णसंधी आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनुसार आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण पहायला मिळाली. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये सोन्याचा दर 300 रुपयांनी घसरला आहे. सराफा बाजारानुसार आज सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून आले असून त्याआधी सोनं साधारण 500 रुपयांनी स्वस्त झाले होते.
काय झाला सोन्याचा भाव?
आज भारतातील २२ कॅरेट सोन्याची किंमत 6,695 प्रति १० ग्रॅम म्हणजे 66 हजार 950 रुपये कॅरेट असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,304 एवढा आहे. तर चांदीचा भाव आज जवळपास 86 हजार 600 रुपयांच्या आसपास जात आहे.
एकाच दिवसात एवढी घसरण
शुक्रवारी सराफा बाजारात सोने चांदीच्या किमतीत घसरण दिसून आल्यानंतर सोन्याचा भाव काल ७१ हजार रुपये प्रति १० ग्रॅम एवढा होता, हाच भाव आज ६६ हजार रुपयांवर येऊन थांबल्याने जवळपास ५ हजारांनी प्रति १० ग्रॅमचा भाव घसरला आहे.
जाणून घ्या कोणत्या शहरात काय चाललाय भाव?
मुंबई- आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,695 gm आणि 24 कॅरेट सोनेची किंमत ₹ 7,304 प्रति gm आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोनेची किंमत ₹ 6,695 प्रति ग्राम आणि 24 कॅरेट सोनेची किंमत ₹ 7,304 प्रति ग्राम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,695 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,304 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,695 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,304 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,695 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,304 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,698 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,307 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,695 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,304 रुपये प्रति ग्रॅम आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या
देशांतर्गत बाजाराशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. कॉमेक्सवर सोन्याचा भाव 9.63 डॉलरने घसरला आहे. तर दुसरीकडे आंतरराष्आट्जरीय बाजारात चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यानं खरेदी करणाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं सोन्या चांदीचे दर वाढत आहेत याचा मोठा फटका खरेदी करणाऱ्यांना बसत होता. आता मात्र, दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. वाढत्या दरामुळं ग्राहकांनी सोन्याची खरेदी करण्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता दरात घसरण झाल्याने ग्राहक पुन्हा सोन्याची खरेदी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.