Gold Rate Today : सोने खरेदीची उत्तम संधी! जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर
Gold Rate Today : बुलियन्सच्या वेबसाईटनुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,800 रूपयांवर व्यवहार करत आहे.

Gold Rate Today : भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे तसेच चांदीचे दर काहीसे अस्थिर पाहायला मिळतायत. मागच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात तफावत दिसून येत आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.48 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर एक किलो चांदीचा दर 63,110 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.
सोने-चांदी आजचे दर :
| शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
| मुंबई | 47,483 | 63,110 |
| पुणे | 47,483 | 63,110 |
| नाशिक | 47,483 | 63,110 |
| नागपूर | 47,483 | 63,110 |
| दिल्ली | 47,401 | 63,000 |
| कोलकाता | 47,419 | 63,030 |
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Ban On Palm Oil : खाद्यतेलाच्या किमती घसरणार? सरकार उचलणार 'हे' महत्त्वाचं पाऊल
- Top Gainer May 04, 2022 : शेअर बाजारात पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या कोणते शेअर्स तेजीत आहेत?
- Share Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 600 अंकानी वधारला
Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या





















