Gold Rate Today : सोन्याचे दर 50 हजारांच्या पार; तर चांदीही एक हजारांनी झाली महाग, वाचा आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,950 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय व्यवहारांवर होतो. आज जर सोन्याचे दर (Gold-Silver Rate) पाहिले तर सोन्याच्या दरात 500 रूपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल हजार रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करणं आज महागात पडू शकतं. महाराष्ट्रात सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच सोन्याच्या किंमती वाढल्याने ग्राहकांना महागाईचा फटका बसू शकतो. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,950 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 62,830 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,538
1 किलो चांदीचा दर - 62,830
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,538
1 किलो चांदीचा दर - 62,830
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,538
1 किलो चांदीचा दर - 62,830
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,538
1 किलो चांदीचा दर - 62,830
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,900
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,492
1 किलो चांदीचा दर - 62,740
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 52,930
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 48,519
1 किलो चांदीचा दर - 62,760
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :