Gold Rate Today : दिलासादायक! ग्राहकांना सोनं खरेदीसाठी चांगली संधी; वाचा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,250 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळाली. मात्र, आज ग्राहकांना सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) चांगली संधी आहे. सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी पुन्हा सुरुवात केली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,250 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 67,790 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,250
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,729
1 किलो चांदीचा दर - 67,790
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,240
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,720
1 किलो चांदीचा दर - 67,780
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,240
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,720
1 किलो चांदीचा दर -67,780
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,260
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,738
1 किलो चांदीचा दर - 67,820
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,170
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,656
1 किलो चांदीचा दर - 67,700
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 54,190
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,674
1 किलो चांदीचा दर - 67,730
जागतिक बाजारपेठेतील दर :
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्त्वाच्या बातम्या :
Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा दबाव; सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात घसरण