देशातील 'या' शहरात आहे सर्वात महाग सोनं, किंमत एकूण बसेल धक्का
देशाची राजधानी दिल्लीत सोन्यानं दराचे सर्व विक्रम मोडले आहेत. पण देशात दिल्लीपेक्षाही महाग सोनं एका शहरात मिळत आहे. याबबातची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Gold Rate News : सध्याच्या काळात सोन्याची (Gold) खरेदी करणं मोठं अवघड झालंय. कारण, दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होताना दिसतेय. सध्या सोन्यानं दराची उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीत सोन्यानं दराचे सर्व विक्रम मोडले आहेत. पण देशात दिल्लीपेक्षाही महाग सोनं एका शहरात मिळत आहे. याबबातची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
दिल्लीपेक्षा इंदूरमध्ये सोनं 2000 रुपयांनी महाग
सध्या देशात सोन्याच्या दरानं विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसतेय. देशात सर्वात जास्त महाग सोनं हे दिल्लीत मिळत आहे. मात्र, सध्या दिल्लीपेक्षाही 2000 रुपयांनी महाग सोनं एका शहरात मिळत आहे. मध्य प्रदेशातील इंदूर असं या शहराचं नाव आहे. या शहारत सोन्याच्या दरानं सर्व विक्रम मोडले आहेत. देशातील सर्वात महाग सोनं या शहरात मिळत आहे. इंदूरमध्ये सोन्याचे दर हे 76 हजार रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत.
इंदूरमध्ये सोन्याचा दर हा 75,700 रुपयांवर
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील वायदे बाजारात सध्या सोन्याच दर हे 73 हजार रुपयांच्या आसपास आहेत. तर दुसरीकडे काही शहरात सोन्याचे दर हे विक्रमी पातळी गाठताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीपेक्षा इंदूरमध्ये सोनं 2000 रुपयांनी महाग आहे. इंदूरमध्ये सध्या सोन्याचा भाव हा 75,700 रुपये आहे, म्हणजे सोनं 76 हजार रुपयांच्या जवळ पोहोचलं आहे.
सोन्यासह चांदीच्या दरातही मोठी वाढ
दरम्यान, एकीकडे सोन्याच्या दर दिवसेंदिवस दराची विक्रमी पातळी गाठत असताना दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ होतेय. त्यामुळं चांदी खरेदी करणं देखील सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. चांदीच्या दरात किलोमागे 850 रुपयांची वाढ झालीय. सध्या चांदी 83,700 रुपयांवर पोहोचली आहे.
दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ सुरुच
सोन्याच्या दरात होत असलेल्या वाढीमुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येत आहे. कारण, काही केल्या सोन्याचे दर कमी व्हायला तयार नाहीत. दिवसेंदिवस दरात वाढ सुरुच आहे. सध्या एका बाजूला लग्नसराईचा हंगाम सुरु आहे आणि दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात वाढ होतेय. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. मात्र, आता सोनं खरेदी करताना सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: