(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Rate : सोन्याला पुन्हा झळाळी, 2 दिवसात तब्बल 900 रुपयांची वाढ, खरेदीदारांना मोठा दणका
सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 900 रुपयांची वाढ झाली आहे.
Gold Rate : सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 900 रुपयांची वाढ झाली आहे. दोन दिवसात सोन्याचे दर 75900 वरुन 76800 वर हे दर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे हा दर जी एस टी सोडून आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करावी की नको? असा प्रश्न खरेदीदारांच्या समोर आहे.
जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. आज जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसात सोन्याचे दर तब्बल 900 रुपयांनी वाढले आहेत. सध्या जीएसटी सोडून सोन्याचा दर हा प्रतितोळा 76800 रुपयांवर पोहोचला आहे. दुसीरकडे नागपूरमध्ये देखील प्रतितोळा सोन्याचा दर हा 76800 रुपयांवर पोहोचला आहे. हा दर 24 कॅरेट सोन्याचा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 71400 रुपयांवर गेला आहे.
सणासुदीत सोनं 80 हजारांवर जाण्याची शक्यता
पश्चिम आशिया खंडात सुरु असलेल्या युद्धाचा देखील सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाला आहे. तसेच जागतिक व फेडरल रिझर्व्ह बँकांनी कमी केलेला व्याजदराचा परिणाम देखील सोन्या चांदीच्या भावात तेजी बघायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत भारतात सणासुदीला सुरुवात होणार आहे. करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. यानंतर लग्नाच्या मोसमात सोन्याची मागणीही वाढते. त्यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोन्याच्या मागणीवर कोणताही परिणाम होणार नाही. नेहमीप्रमाणे या सणासुदीतही भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतील. या सणासुदीच्या हंगामात सोन्याच्या मागणीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, अशी त्यांना आशा आहे. त्यामुळं सोनं 80000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या किमतीवर लगेच दिसून येत आहे. तेव्हापासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे, पण याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. व्याजदर कपातीच्या निर्णयानंतर सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भविष्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळं अनेक संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000