Gold Prices India: सोन्याच्या किमतीत आज पुन्हा वाढ; 10 ग्रॅममागे कितीने वाढलं? पुन्हा लाखाच्या वर जाणार? जाणून घ्या सविस्तर
चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यासारख्या अनेक प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.

Gold Prices India: देशभरात गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या भावामध्ये मोठी चढउतार दिसून येत आहे.भारत पाकिस्तान मधील तणाव, अमेरिकेचे टॅरिफ शुल्कांच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये मोठे बदल झाल्याचे दिसले. आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढत असल्याचे चित्र असून सर्वसामान्यांमध्ये सोन्याच्या खरेदीबाबत साशंकता दिसून येत आहे.सोन्याचे भाव पुन्हा एक लाखांच्या वर जातील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, आज (23 मे) रोजी सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यासारख्या अनेक प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.या शहरांमध्ये प्रति 100 ग्रॅम किमतीत 5000 रुपयांनी वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी आता 98,080 रुपये सोनं गेलं आहे. याला देशांतर्गत आणि जागतिक दोन्ही कारणे जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे.
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती?
भारतात आज (25 मे) रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 550 रुपयांनी वाढून 98,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 8 ग्रॅमची किंमत आता 78,464 रुपये असून कालच्या तुलनेत 440 रुपये जास्त आहे. सोन्याची 100 ग्रॅम किंमत कालच्या 975300 रुपयांवरून आता 980800 रुपये झाली आहे. सध्या 18 कॅरेट सोन्याच्या किमतीही वाढल्या आहेत.
देशांतर्गत कोणत्या शहरात सोन्याच्या किमती काय?
आज बेंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹9,808, 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹8,990 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत ₹7,356 प्रति ग्रॅम आहे.
हैदराबादमध्ये सोन्याचे भाव बेंगळुरूसारखेच आहेत. आज येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹9,808, 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹8,990 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत ₹7,356 आहे.
आज केरळमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹9,808, 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹8,990 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत ₹7,356 प्रति ग्रॅम आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹9,808, 22 कॅरेट सोन्याचा दर ₹8,990 आणि 18 कॅरेट सोन्याचा दर ₹7,356 आहे.
राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत थोडी जास्त आहे, ₹9,823, 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹9,005 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत ₹7,368 आहे.
कोलकातामध्येही 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹9,808 आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹8,990 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत ₹7,356 आहे.
येत्या काळात सोन्याच्या किमती वाढणार?
येत्या काळात सोन्याच्या किमती पुन्हा एकदा विक्रमी वेगाने वाढू शकतात. यावर, अमेरिकन एजन्सी जेपी मॉर्गनने भाकित केले आहे. 2026 च्या मध्यापर्यंत सोन्याची किंमत प्रति औंस 4000 डॉलर्स ओलांडू शकते. अलिकडच्या काळात, बँकेने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, मंदीच्या वाढत्या चिंता आणि अमेरिकेने लादलेले उच्च शुल्क आणि अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात.























