एक्स्प्लोर

Gold price: अबब! सोन्याच्या भाव एका रात्रीत 1500 रुपयांनी वाढला, जीएसटीसह आजचे दर किती? पावणेपाच वर्षांनी सोने-चांदी आलेले एकाच लेव्हलला

Gold price: काहीच दिवसांवर अक्षय तृतीया असल्याने देखील सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर लग्नसराई असल्याने सोने महाग झाले तरी खरेदी करताना दिसत आहेत.

जळगाव: सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून सोन्याच्या दरात रात्रीतून पुन्हा 1500 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 99000 रुपये झाले आहेत. तर जीएसटीसह हेच सोन्याचे दर 102000 रुपये इतके झाले आहेत. आज अजूनही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता सोने व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि चायना मधील ट्रेड वॉर सोन्याच्या किंमती वाढीस कारणीभूत असल्याचं मानले जात आहे. दरम्यान काहीच दिवसांवर अक्षय तृतीया असल्याने देखील सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर लग्नसराई असल्याने सोने महाग झाले तरी खरेदी करताना दिसत आहेत.

सोमवारी जीएसटीसह 1 लाख 219 रुपये प्रति तोळा दर

सोने-चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचं चित्र आहे. जळगावात सोमवारी सोने भावात सकाळी 600 व संध्याकाळी पुन्हा 700 रुपयांची वाढ झाली होती. यामुळे सोने 97.300 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. तर जीएसटीसह 1 लाख 219 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तसेच, चांदीत 1200 रुपयांची वाढ होऊन, ती 97,500 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

सकाळी सोने चांदीचे भाव प्रत्येकी 96,500 रुपयांवर होते. पावणे पाच वर्षांनतर काल (सोमवारी) सकाळी सोने-चांदीचे भाव एकसारखे (सोने प्रति तोळा व चांदी प्रति किलो) झाल्याचे दिसून येत होते. नागपुरातही सोने जीएसटीसह 1 लाख 425 रुपयांवर (मूळ भाव 97,500 रुपये प्रतितोळा) पोहोचले. पहिल्यांदाच चांदीपेक्षा सोन्याचे भाव जास्त झाले. एप्रिल महिन्यात 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 6,100 रुपयांची वाढ झाली. शनिवारच्या 95,800 रुपयांच्या तुलनेत सोने 1,700 हजारांनी वाढून 97,500 रुपयांवर पोहोचले. तर चांदीही 700 हजारांनी वाढून 96,300 रुपयांच्या तुलनेत भाव 97 हजारांवर पोहोचले आहे.

20 टक्क्यांहून अधिक परतावा

 गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीचे दर आगामी काळात कमी होती असा तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरला आहे. ट्रम्प इफेक्टमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीचे दर कमी होतील आणि त्याचा फटका भारताला बसेल, असा तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज अखेर फोल ठरला आहे. यावर्षी ग्राहकांना 20 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला.

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठेल

येत्या 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. यादिवशी सोन्याचा भाव एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज होता. मात्र, त्यापूर्वीच सोन्याच्या भावाने लाखाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठेल, अशी शक्यता आहे. जानेवारी महिन्यापासून सोन्याच्या भावात चढ-उतार होताना दिसले आहे. 01 जानेवारी 2025 रोजी, 24 कॅरेट सोन्याचा दर 77,577 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर 31 जानेवारी 2025 रोजी तो 83,107 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला. त्यानंतर आता सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 99,500  इतका झाला आहे. आगामी काळात सोन्याचा भाव असाच वाढत जाईल, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. यंदाच्या वर्षाच्या शेवटापर्यंत एक तोळा सोन्याचा भाव हा 2 लाखांची पातळी गाठेल, असे भाकीत काही तज्ज्ञांनी वर्तविले आहे. तसे घडल्यास लग्नसराईसाठी सोने खरेदी करणे, सर्वसामान्यांना अवघड होईल.

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget