एक्स्प्लोर

Foxconn Vedanta Semiconductor:  महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला धक्का; फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा करार मोडला

Foxconn Vedanta Project:  गुजरात होऊ घातलेल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला धक्का बसला आहे. फॉक्सकॉन कंपनीने वेदांतासोबतचा करार मोडला असल्याचे जाहीर केले आहे.

Foxconn Vedanta Semiconductor:  सेमीकंडक्टर (SemiCondutor Project) उत्पादन करणारी कंपनी फॉक्सकॉनने (Foxconn) मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सेमीकंडक्टर बनवण्यासाठी वेदांतासोबत (Vedanta) केलेला करार मोडण्याचा निर्णय फॉक्सकॉनने जाहीर केला आहे. मागील वर्षी वेदांता आणि फॉक्सकॉने गुजरातमधील 19.5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. या प्रोजेक्टवरून महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापलं होतं. 

'रॉयटर्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. फॉक्सकॉनने याबाबत एक वृत्तपत्र निवेदन जारी केले आहे. वेदांतासोबत संयुक्त प्रकल्प न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे फॉक्सकॉनने जाहीर केले आहे. 

मागील वेदांताने डिस्क्लोजर देत, प्रोजेक्ट आपणच चालवत आहोत, असे वाटत असल्याचे म्हटले होते. कंपनीने स्पष्टीकरण देताना म्हटले की, वॉलकॅन इन्व्हेस्टमेंट प्रकल्पाबाबत हे भाष्य केले होते, असे म्हटले. मागील आठवड्यात शेअर बाजार नियामक सेबीने वेदांताला दंड ठोठावणार असल्याचे जाहीर केले होते. वेदांताने फॉक्सकॉनसोबत भागिदारी केली असल्याचे भासवले. ही कृती नियामकांच्या विरोधात असल्याचे सेबीने म्हटले. 

शुक्रवारी, वेदांताने ज्वाइंट व्हेंचर असलेल्या होल्डिंग कंपनीचे अधिग्रहण करणार असल्याचे जाहीर केले होते. या कंपनीने फॉक्सकॉनसोबत सेमीकंडक्टर तयार करण्यासाठीचा करार केला होता. कंपनीने सांगितले होते की, ते डिस्प्ले ग्रास मॅन्यूफॅक्चरिंग व्हेंचरचे वॉलकॅन इन्व्हेस्टमेंटकडून अधिग्रहण करणार आहे. 

मागील वर्षी, अनिल अग्रवाल (Anil Agrawal) यांच्या वेदांता कंपनीने फॉक्सकॉनसोबत गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. वेदांता समूहाला सेमीकंडक्टर प्लांट लावण्यासाठी गुजरात सरकारकडून आर्थिक आणि बिगर-वित्तीय अनुदान देण्यात आले होते. यामध्ये स्वस्त दरात वीज आणि इतर बाबींचा समावेश होता. 

दरम्यान, केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी वेदांतासोबतचा करार फॉक्सकॉनने मोडल्याने भारताच्या सेमीकंडक्टर प्रकल्पावर परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.  

वेदांता-फॉक्सकॉनवरून राज्यात राजकारण

वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प हा महाराष्ट्रात येणार होता. मात्र, हा प्रकल्प गुजरातला अचानकपणे गेल्याने मोठं राजकारण गाजलं. मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न न केल्याने केंद्राच्या मदतीने हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. तर, मविआ सरकार सत्तेवर असताना परवानगी आणि इतर बाबी रखडल्यानेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे शिवसेना शिंदे गट-भाजपने म्हटले. 

सेमीकंडक्टरचा प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे 80 हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातील 30 टक्के रोजगार हा थेट रोजगार असणार होता. तर, जवळपास 50 टक्के रोजगार हा अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली असती.  वेदांताने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनी समवेत भागीदारी केलेली. या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन आणि 63 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच 3800  कोटी रुपयाचे सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग फॅसिलिटी होणार होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Embed widget