एक्स्प्लोर

भारताच्या तिजोरीत मोठी भर, परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, पाकिस्तानकडे किती साठा?

भारताच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. 23 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 6.992 अब्ज डॉलर्सने वाढून 692.721अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे

India Forex Reserve :  भारताच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. 23 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 6.992 अब्ज डॉलर्सने वाढून 692.721अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ही माहिती दिली आहे. यापूर्वी, 16 मे रोजी संपलेल्या आठवड्यात, देशाचा परकीय चलन साठा 4.888 अब्ज डॉलर्सने घसरून 685.729 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. 

सप्टेंबर 2024 च्या अखेरीस परकीय चलन साठा 704.885 अब्ज डॉलर्सच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 23 मे रोजी संपलेल्या आठवड्यात, परकीय चलन साठ्याचा एक प्रमुख घटक असलेली परकीय चलन मालमत्ता 4.516 दशलक्ष डॉलर्सने वाढून 586.167 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. डॉलरच्या दृष्टीने व्यक्त होणाऱ्या परकीय चलन मालमत्तेत परकीय चलन साठ्यात असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या गैर-अमेरिकन चलनांचा चढ-उतार परिणाम समाविष्ट आहे.

सोन्याच्या साठ्यातही वाढ 

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात सोन्याचा साठा 2.366 अब्ज डॉलर्सने वाढून 83.582 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. विशेष रेखांकन हक्क (एसडीआर) 81 दशलक्ष डॉलर्सने वाढून 18.571 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात आयएमएफकडे भारताची राखीव ठेवही सुधारली आहे, जी 30 दशलक्ष डॉलर्सने वाढून 4.401 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

पाकिस्तानकडे किती साठा?

स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (एसबीपी) ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 23 मे पर्यंत पाकिस्तानचा परकीय चलन साठा 70 दशलक्ष डॉलर्सने वाढून 11.156 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. तर 16 मे रोजी तो 11.447 अब्ज डॉलर्स होता. पाकिस्तानचा तरल परकीय चलन साठा 16.637 अब्ज डॉलर्सवर होता. जो गेल्या आठवड्याच्या तुलनेत 12 दशलक्ष डॉलर्सची किंचित घट दर्शवितो. यामध्ये व्यावसायिक बँकांच्या निव्वळ होल्डिंग्जचाही समावेश आहे. या कालावधीत, व्यावसायिक बँकांच्या निव्वळ राखीव निधीतही 82 दशलक्ष डॉलर्सची घट झाली, जी 5.121 अब्ज डॉलर्सवर आली आहे.

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सरकारला लाभांश जाहीर

गेल्या 7 दिवसापूर्वी देखील भारताच्या तिजोरीत मोठी भर पडली होती. मोदी सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मध्यवर्ती बँकेकडून केंद्राला 2.1 लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश दिला होता. रुपया स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलर्सची विक्री केली आहे. अशातच या विक्रीतून चांगले उत्पन्न आले आहे.  तसेच लिक्विडीटी ऑपरेशन्स अंतर्गत बँकांना मोठ्या प्रमाणात निधी दिल्यानंतर त्याबदल्यात व्याजाच्या स्वरुपात आरबीआयला नफा झाला आहे. 

दरम्यान, आरबीआयला चांगले उत्पन्न मिळाल्यानं केंद्राच्या मिळणाऱ्या लाभांशमध्ये वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून मिळणारी रक्कम केंद्राच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा आधार आहे. चालू वर्षात सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अधिक पैसे खर्च करण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून सरकारला मिळणारा लांभाश वित्तीय तूट कमी करण्यासाठी महत्त्वाचा आहे.  लाभांशद्वारे निधी मिळाल्यास सरकारला कर्ज उभारण्याची गरज उरत नाही. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
Embed widget