एक्स्प्लोर

बिग बिलियन डेज पुन्हा आले! आयफोनपासून ते टीव्हीपर्यंत मोठी सूट मिळणार; जाणून घ्या सविस्तर  

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट पुन्हा एकदा बम्पर ऑफर घेऊन आले आहेत. या कंपन्यांकडून ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि बिग बिलीयन डेज पुन्हा आणले आहेत.

Amazon and Flipkart: सध्या वेगवेगळ्या सणांना सुरवात झाली आहे. याच कारणामुळे अनेक कंपन्या आपले उत्पादन विकण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणतात. या ऑफर्सअंतर्गत अनेक उत्पादनं ही कमी पैशांत विकली जातात. या काळात इलेक्ट्रॉनिक्स कंन्यांकडूनही आपल्या उत्पादनांवर भरपूर सूट दिली जाते. याच पार्श्वभूमीवर आता ईकॉमर्स प्लेटफॉर्म्स वेगवेगळ्या उत्पादनांवर ऑफर्स वर्षाव करत आहेत. आता ईकॉमर्स सेक्टरच्या (Ecommerce Sector) अॅमोझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या भरघोस ऑफर्स घेऊन आल्या आहेत. आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्या पुन्हा एकदा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Great Indian Festival)  आणि बिग बिलियन डेज (Big Billion Days) घेऊ आल्या आहेत.  

अॅमेझॉनवर ग्रेट इंडिया फेस्टिव्हल कधी सुरू होणार? 

या वर्षी अॅमेझॉनवर ग्रेट इंडिया फेस्टिव्हल येत्या 29 सप्टेंबरपासून चालू होत आहे. या काळात 29 ऑक्टोबरपर्यंत ग्राहकांना वेगवेगळे प्रोडक्ट्स हे कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत. या ऑक्टोबर महिन्यात दसरा (Dussehra 2024) आणि दिवाळी (Deepawali 2024) हे महत्त्वाचे सण आहेत. म्हणून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने यावेळी ग्रेड इंडिया फेस्टिव्हल आणि बिग बिलीयन डेज आणले आहेत. अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठ ग्रेट इंडिया फेस्टिव्हल अगोदरच चालू होणार आहे. सोबतच त्यांना स्पेशल ऑफर्स दिल्या जातील. 

अॅमेझॉन कोणकोणत्या ऑफर्स देणार?

ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या काळात अॅमेझॉनकडून आकर्षक ऑफर्स दिल्या जाणार आहेत. या काळात ऑपिंगसाठी एसबीआयचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या 10 टक्क्यांची सूट दिली जाईल. तसेच या काळात आयफोनवरही (iPhone) सूट मिळणार आहे. यासह सॅमसंग, ओप्पो, वनप्लस, रियलमी अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनवरही भरभक्कम सूट दिली जाईल. सॅमसंग, सोनी आणि एलजी टीव्ही या काळात कमी किमतीत मिळतील. 

फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज कधी चालू होणार?

अॅमेझॉनप्रमाणेच फ्लिपकार्टनेही वेगेवगळ्या ऑफर्स आणल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अॅमेझॉनच्या ग्रेड इंडियन फेस्टिव्हलच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 27 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टचे बिग बिलियन डेज सुरु होणार आहेत. फ्लिपकार्टचे हे बिग बिलियन डेज 6 ऑक्टोबरपर्यंत असतील. यातही फ्लिपकार्ट प्लस (Flipkart Plus) आणि व्हीआयपी मेंबर्ससाठी बिग बिलीयन डेज लवकरच चालू होतील.  

फ्लिपकार्टचा एचडीएफसीसोबत करार, बम्पर सूट दिली जाणार 

फ्लिपकार्टने बिग बिलियन डेजसाटी एचडीएफसी बँकेसोबत (HDFC bank) करार केला आहे. या काळात एचडीएफसी बँकेतर्फे 10 टक्के सूट दिली जाईल. यासह कॅशबॅक, रिवॉर्ड तसेच इतरही ऑफर्स या काळात दिल्या जातील. या काळात होम अप्लायन्सेस, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, ब्यूटी, होम डेकोर, पुस्तके, लहान मुलांच्या वस्तू, स्मार्टफोन आदी वस्तूंवर बम्पर सूट दिली जाईल. 

हेही वाचा :

पैसे कमवण्याची पुन्हा मोठी संधी! बड्या कंपनीचा तब्बल 7000 कोटींचा तगडा आयपीओ येणार

15000 चे थेट झाले 25000 रुपये! बजाज फायनान्सनंतर आता पीएन गाडगीळच्या IPO ची हवा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Embed widget