31 July Deadline : आजच करुन घ्या 'ही' चार महत्त्वाची कामं, नाहीतर होईल अडचण, एकदा यादी पाहून घ्या
31 July Deadline : 31 जुलै रोजी आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही आर्थिक वर्ष 2021-22 मधील आयकर परतावा दाखल केला नसेल, तर आजच करुन घ्या.
Financial Deadlines : आज 31 जुलै आहे, या महिन्याचा शेवटचा दिवस. आज अनेक आर्थिक कामांसाठीची मुदत संपत आहे. त्यामुळे जर तुमची ही कामं राहिली असतील तर ही कामं लगेच पूर्ण करुन घ्या, अन्यथा तुमच्या समोर अनेक अडचणी येतील. याशिवाय तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे ही कामं आजच आटपून घ्या नाहीतर तुम्हाला नुकसान भोगावं लागेल. यामधील महत्त्वाचं एक काम म्हणजे आयकर परतावा. आज 31 जुलै रोजी आयकर परतावा दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
1. आयटी रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख (ITR Filing Deadline)
आज आयटी रिटर्न दाखल करण्याची (ITR Filing Deadline) शेवटची तारीख आहे. यानंतर आयकर परतावा दाखल केल्यास दंड भरावा लागणार आहे. आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मूल्यांकन वर्ष 2022-2023 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. यावेळी सरकारने मुदतवाढ न देण्याचे संकेत दिले आहेत. जर तुम्ही अंतिम मुदतीपर्यंत ITR दाखल करू शकत नसाल, तर तुम्हाला ITR उशिरा दाखल करताना दंड भरावा लागेल. याशिवाय, तुम्हाला आयकर विभागाकडून प्राप्तिकर सूचना मिळू शकते. यानंतर, तुम्हाला कर भरावा लागेल, तसेच दंड भरावा लागेल.
2. पीएम किसान योजनेसाठी E-KYC भरण्याची अंतिम मुदत
पीएम किसान योजनेसाठी E-KYC (PM Kisan Scheme E-KYC) भरण्यासाठीही आज अंतिम मुदत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सहजरित्या लाभ मिळावा यासाठी यावा केंद्र सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख पडताळणी (ई-केवायसी) करण्याचा योजना राबवली. E-KYC पूर्ण करण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं ज्या लाभार्थ्यांनी 31 आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांना ती 31 जुलैच्या आत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
3. रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक
जर तुम्ही उत्तराखंडचे रहिवासी आहात तर तुम्हाला सरकारच्या तीन मोफत सिंलेडर मिळण्याच्या योजनेचा लाभ मिळण्याची आज शेवटची तारीख आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करावं लागेल. यासाठी सरकारने 31 जुलैपर्यंतची अंतिम मुदत दिलेली आहे.
4. इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी मिळवण्याची शेवटची संधी
जर तुम्ही गोवा राज्यातील रहिवासी आहात, तर गोवा राज्य सरकारद्वारे देण्यात येणारी इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी मिळवण्याची आज शेवटची संधी आहे. गोवा सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिलेली होती. गोवा सरकारकडून 31 जुलैपर्यंत इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर तीन लाख रुपयांपर्यंतची सबसिडी देण्यात येत आहे. राज्य सरकार टू-व्हिलरवर 30,000 रुपये, थ्री व्हिलरवर 60,000 रुपये आणि कारवर तीन लाख रुपयांपर्यंत सबसिडी देण्यातस येत आहे.