एक्स्प्लोर

EPFO Withdrawal : EPFO मधून पैसे काढण्याची चूक पडू शकते महागात! हे आहेत ते 5 मोठे नुकसान 

PF हा नोकरदार वर्गासाठी त्यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी सर्वात विश्वासार्ह गुंतवणुकीपैकी एक आहे. पण अनेकदा लोक गरजेच्या वेळी त्यातून पैसे काढतात. पण यामुळे तुमचे Retirement Planning वर परिणाम होतो.

PF हा नोकरदार वर्गासाठी त्यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी सर्वात विश्वासार्ह गुंतवणुकीपैकी एक आहे. पण अनेकदा लोक गरजेच्या वेळी त्यातून पैसे काढतात. हा निर्णय तात्काळ दिलासा देत असला तरी, पण यामुळे तुमचे Retirement Planning, Tax Benefits यावर मोठा परिणाम होतो.  PF खात्यातून पैसे काढल्यास होणारे 5 मोठे तोटे कोणते आपण जाऊन घेऊयात..

1. चक्रवाढ व्याज

EPFO ची खरी ताकद असते ती 'व्याजावर व्याज' म्हणजेच (चक्रवाढ व्याज) मिळण्यात. दरवर्षी तुमची जमा रक्कम वाढत जाते आणि पुढच्या वर्षी त्या वाढलेल्या रकमेवर पुन्हा व्याज मिळते. पण, तुम्ही मध्येच पैसे काढले की, ही व्याजाची चेन तुटते. यामुळे, निवृत्तीच्या वेळी जी मोठी रक्कम मिळायला हवी, ती खूप कमी होते.

02. निवृत्ती निधी (Retirement Fund) 

EPFO चा मुख्य उद्देश निवृत्तीनंतर आधार देणे हा आहे. जेव्हा तुम्ही त्यातून पैसे काढता, तेव्हा तुमची अंतिम बचत कमी होते. जर एखादी व्यक्ती दर महिन्याला 5000 जमा करत असेल आणि 25 वर्षांपर्यंत EPFO ला हात लावत नसेल, तर त्याला अंदाजे 50-55 लाख मिळू शकतात. पण जर त्याने मध्येच तीन-चार वेळा पैसे काढले, तर ही रक्कम फक्त 30-35 लाखांपर्यंत खाली येऊ शकते. म्हणजेच निवृत्तीच्या वेळी मिळणारी आर्थिक सुरक्षा कमकुवत होते.

3. कर लाभांवर (Tax Benefit) परिणाम 


EPF मध्ये केलेली गुंतवणूक कमीतकमी 5 वर्षांसाठी ठेवा, म्हणजे तुम्हाला गुंतवणूक, व्याज आणि काढलेले पैसे या तिन्हीवरही 'कर' भरावा लागणार नाही.  जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी EPF मधून पैसे काढले, तर त्यावर तुम्हाला कर भरावा लागतो. काढलेले व्याज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये जोडले जाते आणि  TDS देखील कापला जाऊ शकतो.

04. आपत्कालीन निधी (Emergency Fund) 

अनेक लोक EPFO चा वापर आपत्कालीन निधी म्हणून करतात, पण त्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. EPFO हे तुमच्या दीर्घकालीन (Long-term) सुरक्षेसाठी आहे, छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही. PF चा
वापर  फक्त शेवटचा पर्याय म्हणून करा, तोही तेव्हाच जेव्हा इतर कोणताही मार्ग नसेल. 

5. भविष्यातील नोकरी आणि पेन्शन लाभांवर परिणाम

PF खात्यातून पैसे काढल्याने तुमच्या EPS Employee Pension Scheme बॅलन्सवरही परिणाम होतो.  जर तुम्ही वारंवार खाते बंद केले किंवा पैसे काढले, तर तुमची नोकरीची सेवा हिस्ट्री (Service History) रीसेट होऊ शकते. याचा अर्थ, निवृत्तीच्या वेळी मिळणारी पेन्शन किंवा ग्रॅच्युइटीची गणना कमी सेवा कालावधीवर होईल. पैसे काढल्यामुळे हा लाभ कमी होतो.

About the author सलमान शेख

सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget