EPFO: पीएफच्या व्याजदराबाबत मोठी अपडेट, व्याज दर वाढणार की कमी होणार? कर्मचाऱ्यांना दिलासा की फटका, लवकरच निर्णय
EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून पुढील महिन्यात व्याज दराबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी व्याज दर 8.25 टक्के होता.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून कर्मचाऱ्यांच्या पगारातून जी रक्कम जमा केली जाते, त्यावर व्याज दिलं जातं. आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफवर किती व्याज मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2024-25 मध्ये ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांना 8.25 टक्के व्याज देण्यात आलं होतं. 2025 मध्ये त्यामध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईपीएफओकडून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्याज दर 8 टक्के ते 8.20 टक्क्यांदरम्यान दिलं जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी व्याज दर कमी राहण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात ईपीएफओच्या 239 व्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्र्स्टीजची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यावेळी व्याज दराबाबत मोठी घोषणा होऊ शकते.
ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांच्या जमा रकमेवर जे व्याज दिलं जातं त्यासंदर्भातील निर्णय घेणं देखील आव्हानात्मक मानलं जातंय. पुढील काळात निवडणुका असल्यानं सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठ व्याज दरात कपात न करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पीएफचा व्याज दर 8.25 टक्के ठेवला जाऊ शकतो.
गेल्या काही वर्षांपासून ईपीएफओकडून व्याज दरात फार बदल करण्यात आलेले नाहीत. कर्मचाऱ्यांची बचत दीर्घकाळ सुरक्षित राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. निवडणुकीचा कालावधी पाहता व्याज दर कायम देखील ठेवले जाऊ शकतात.
ईपीएफओ आणखी एक मोठा बदल करण्याबाबत विचार करु शकते. सध्या 15000 रुपये मासिक पगार मिळणाऱ्यांना पीएफच्या कक्षेत घेतलं जातं. मात्र, आगामी काळात ती मर्यादा बदलली जाऊ शकते. ज्यातून अधिक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळू शकेल, असा ईपीएफओला अंदाज आहे. जर पगाराची मर्यादा वाढली तर कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचा निवृत्तीचा फंड वाढू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या






















