एक्स्प्लोर

Gold Silver Rate: सोनं पुन्हा दीड लाखांच्या पार तर चांदी 248000 वर; सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; आता खरेदी करावी का?

Gold Silver Rate: आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीही महाग झाली आहे. सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे की नाही, हे आपण जाणून घेऊया.

जळगाव : आज सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदी दरात पुन्हा मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासात 2500ची वाढ होऊन काल (गुरूवारी, ता 20) 156000 रुपये असलेले सोन्याचे दर आज (शुक्रवारी, ता 21) 158500 वर जाऊन पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात ही 8000 हजार रुपयांची वाढ होऊन काल (गुरूवारी, ता 20) असलेले 240000 दर आज (शुक्रवारी, ता 21) 248000 वर जाऊन (Gold Silver Rate 21 August 2026) पोहोचले आहेत. दोन्ही दर जीएसटी शिवायचे आहेत. डॉलर इंडेक्समध्ये झालेली घसरण आणि अमेरिकन फेडरल बँकांत व्याज दरात वाढ न होण्याचे संकेत याचा एकत्रित परिणाम सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ होऊन, सोने चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं सांगतिले जात आहे.(Gold Silver Rate 21 August 2026)

Gold Silver Rate: जागतिक बाजारातील सोने चांदीचे भाव किती?

जागतिक बाजारात देखील सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळत आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळीच सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. 24 कॅरट सोन्याच्या दरात 4300 रुपयांची वाढ झाली असून ते 1 लाख 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे, चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल 10000 रुपयांची तुफान वाढ झाली आहे.

Gold Silver Rate: सोन्याचे दर किती वाढले?

काल, 20 ऑगस्ट रोजी 24 कॅरट शुद्ध सोन्याचा भाव 1,58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज त्यात 4,300 रुपयांची वाढ होऊन तो 1,62,000 रुपयांवर आला आहे. गेल्या 3 महिन्यांतील सोन्याचा हा उच्चांकी दर ठरला आहे. यापूर्वी 26 मे रोजी 24 कॅरट सोन्याचा भाव जवळपास एवढाच महाग झाला होता आणि त्यावेळी सोन्याचा व्यवहार 1,62,400 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने झाला होता.

Gold Silver Rate: चांदीच्या दरात किती वाढ?

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. शुद्ध चांदीचा दर २,३५,००० रुपये प्रति किलोग्रामवरून वाढून थेट २,४५,००० रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचला आहे. म्हणजेच चांदीमध्ये थेट १०,००० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या सात आठवड्यांतील चांदीचा हा सर्वांत मोठा उच्चांक आहे. याआधी ३ जुलै रोजी चांदीने २,४५,००० रुपये प्रति किलोग्रामचा टप्पा गाठला होता.

Gold Silver Rate: सोने-चांदी का महागले? 

अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्ड (Bond Yield) मध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे आज सोने दोन महिन्यांहून अधिक काळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव 66.31 डॉलरच्या घसरणीसह 4,456.72 डॉलर प्रति औंसवर आला आहे, तर चांदीचा भाव सुमारे दोन टक्क्यांनी घसरून 65.82 डॉलर प्रति औंस झाला आहे.

ट्रम्प यांचा निर्णय आणि कच्चा तेल: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, ज्यामुळे स्पॉट गोल्ड (Spot Gold) ची किंमत 4,450 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: सोनं पुन्हा दीड लाखांच्या पार तर चांदी 248000 वर; सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; आता खरेदी करावी का?
सोनं पुन्हा दीड लाखांच्या पार तर चांदी 248000 वर; सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; आता खरेदी करावी का?
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Embed widget