Edible Oil Price : दिलासादायक! वाढत्या महागाईतून दिलासा, खाद्यतेलाचे भाव घसरले
Edible Oil Price : सर्वसामान्यांनांना वाढत्या महागाईतून काहीसा दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारात घसरण झाल्याने खाद्यतेलाच्या दरात घसरण झाली आहे.
Edible Oil Price Down : सर्वसामान्यांनांना वाढत्या महागाईतून काहीसा दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक बाजारात घसरण झाल्याने त्याचा परिणाम खाद्यतेलाच्या किंमतींवर झाला आहे. जागतिक बाजारात घसरण झाल्याने भारतीय बाजारात खाद्यतेलाचे भाव गडगडले आहेत. खाद्यतेल स्वस्त झालं आहे. भारतीय बाजारात भूईमुगाचं तेल वगळता इतर तेलाच्या दरात कपात झाली आहे.
तेल आयातदाराची चिंता वाढली
सध्या जागतिक बाजारात मंदीचं सावट आहे. यामुळे चिंतेचं वातावरण आहे. जागतिक बाजारात घसरण झाल्याने तेलाचे भाव घसरले आहेत. यामुळे तेल आयातदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. खाद्यतेल उद्योजकही संकटात आहेत. तेल आयातदारांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तेल उद्योजकांवर कर्ज बुडण्याचं संकट आहे. याचं कारण म्हणजे तेलाच्या दरात मोठी घसरण होणार आहे. पामतेलाचे दर सुमारे 20 रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे म्हणजे पामतेलाचे दर 90 ते 92 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचतील. यामुळे उद्योजकांना नुकसान होईल.
अनेक तेलांचे दर घसरले
सोयाबीन तेल, मोहरीचं तेल आणि पामोलिन तेलाचे भाव परदेशातील घसरणीमुळे तोट्यात आहेत. परदेशातील तेलबियांच्या बाजारात प्रचंड अस्थिरता असून, त्यामुळे सर्वच नाराज आहेत. यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन तेलबियांचे उत्पादन वाढवणं हा आहे.
एक लिटर तेलाची किंमत जाणून घ्या...
मोहरीचं तेल - 7190 रुपये ते 7240 रुपये प्रति क्विंटल (42 टक्के स्थिती दर)
भुईमूग - 6870 रुपये ते 6995 रुपये प्रति क्विंटल
भुईमूग तेल मिल वितरण (गुजरात) - 16000 रुपये प्रति क्विंटल
भुईमूग सॉल्व्हेंट रिफाइंड तेल - 2670 रुपये ते 2860 रुपये प्रति टिन
मोहरीचे तेल (दादरी) - 14500 रुपये प्रति क्विंटल
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Petrol-Diesel Price : महागाईनं बेजार... पेट्रोल-डिझेलनंतर CNG मुळं खिशाला कात्री; गाडीची टाकी फुल्ल करण्यासाठी किती पैसे लागतील?
- Gold Rate : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, एक देश, एक दर! देशभरात एकाच दरात होणार सोने विक्री
- 5G Spectrum: 5G नेटवर्क तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक? ही बातमी वाचून तुमचे गैरसमज दूर होतील
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
