एक्स्प्लोर

Multibagger IPO Droneacharya: शेअर असावा तर असा! फक्त पाच दिवसात एक लाखाचे झाले 2.40 लाख रुपये

Multibagger IPO Droneacharya: ड्रोनआचार्य ड्रोन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर सलग पाचव्या दिवशी अप्पर सर्किट लागले आहे.

Multibagger IPO Droneacharya: मागील दोन दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरू (Share Market) असताना दुसरीकडे काही शेअर्स सुस्साट पळत आहे. शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यापासून अवघ्या पाच दिवसात या शेअरने गुंतवणूकदारांना दीडपट नफा मिळवून दिला आहे. शेअर बाजारात ड्रोन कंपनी ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेंशन (DroneAcharya AI) शुक्रवारी सूचीबद्ध झाली होती. त्यानंतर सलग पाचव्या दिवशी या कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट (Upper Circuit) लागले आहे. 

आज गुरुवारीदेखील या कंपनीचा शेअर बीएसईवर टक्क्यांनी वधारत 130.10 रुपयांवर व्यवहार करत होता. आयपीओमध्ये 54 रुपये प्रति शेअर इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती. आयपीओ बाजारात लिस्ट झाल्यानंतर आतापर्यंत 140 टक्क्यांनी शेअर दर वधारला आहे. 

लिस्टिंगच्या दिवशीच पैसे दुप्पट

DroneAcharya AI कंपनीने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले होते. त्यानंतर या कंपनीच्या शेअर दरात अप्पर सर्किट लागत आहे. 

आमिर खान आणि रणबीर कपूर यांना ब्लॉकबस्टर फायदा

शंकर शर्मा यांच्याकडे या कंपनीचे 4.57 लाख शेअर आहेत. जवळपास 2.45 कोटी रुपयांची त्यांची गुंतवणूक आता जवळपास दुप्पट झाली आहे. तर, वर्षाच्या सुरुवातीला प्री-आयपीओ काळात निधी जमवताना बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याने जवळपास 25 लाख रुपयांमध्ये ड्रोनआचार्य कंपनीचे 46,600 शेअर खरेदी केले होते. तर, रणबीर कपूरने 37,200 शेअर खरेदी करण्यासाठी जवळपास 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. प्री-आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 53.59 रुपये प्रति शेअर इतका दर देण्यात आला होता. 

आयपीओला जबरदस्त प्रतिसाद

पुण्यातील या ड्रोन स्टार्टअपला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ ओव्हरसबस्क्राइब झाला होता. तीन दिवसांत ते 262 पटीने सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला कोटा हा 330 पटीने सबस्क्राइब झाला होता. 

DroneAcharya AI ही 2022 मध्ये DGCA (Directorate General of Civil Aviation) प्रमाणित RPTO (रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन) परवाना मिळवणारी पहिली खाजगी कंपनी आहे. मार्च 2022 पासून कंपनीने 200 हून अधिक ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षण दिले आहे. 

(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.) 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi at Vantara : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनतारा वाईल्ड लाईफचं उद्घाटनVidhan Sabha : विरोधी पक्षनेतेपदी Bhaskar Jadhav यांची वर्णी, ठाकरेंचे आमदार अध्यक्षांच्या भेटीलाABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 05 PM 04 March 2025Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Shubman Gill Travis Head Catch : शुभमन गिलच्या सेलिब्रेशनवरून भर मैदानात वाद, ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडताच अम्पायरला 'ती' कृती खटकली; नेमकं काय घडलं?
शुभमन गिलच्या सेलिब्रेशनवरून भर मैदानात वाद, ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडताच अम्पायरला 'ती' कृती खटकली; नेमकं काय घडलं?
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
Embed widget