Go First offer : अवघ्या 751 रुपयांत देशांर्तग विमान प्रवास, गो फर्स्टची खास ऑफर
विमान तिकिटांचे हे बुकिंग 19 सप्टेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत हवाई प्रवासासाठी बुक केले जाऊ शकते. ही ऑफर इतर कोणत्याही ऑफरसोबत जोडली जाऊ शकत नाही.
GoAir Offer : एकदा तरी विमानात बसावं अशी अनेकांची इंच्छा असते. मात्र विमान तिकीट महाग असल्याने अनेकांना ते परवडत नाही. मात्र आता स्वस्तात विमान प्रवास करण्याची संधी मिळत आहे. गो फर्स्ट (Go First) एक खास सेल ऑफर करत आहे. ज्यामध्ये तुम्हाला 751 रुपयांमध्ये फ्लाइट तिकिटे मिळतील. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ही ऑफर सुरू झाली आहे. Go First च्या ऑफर अंतर्गत, 17 ऑगस्टपर्यंत बुकिंग करता येईल. देशांतर्गत उड्डाणे बुक करण्यासाठी प्रवासी या ऑफरचा वापर करू शकतात.
विमान तिकिटांचे हे बुकिंग 19 सप्टेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत हवाई प्रवासासाठी बुक केले जाऊ शकते. ही ऑफर इतर कोणत्याही ऑफरसोबत जोडली जाऊ शकत नाही. हे ग्रुप बुकिंगसाठी देखील लागू होणार नाही. देशांतर्गत उड्डाणांसाठी ही ऑफर दिली जात आहे. 751 रुपयांची हवाई तिकिटे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिली जात आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सीट्सचे बुकिंग आधी या आणि आधी मिळवा या तत्त्वावर असेल. कंपनीने सांगितले की फ्लाईटच्या वेळा बदलल्या जाऊ शकतात.
SALE-brate Freedom on the Go!#GoFirstIndependenceSale starting at just ₹751*! 🇮🇳
— GO FIRST (@GoFirstairways) August 15, 2021
So what are you waiting for? Get Go-ing! ✈️
Book now - https://t.co/XZgHMXthWW pic.twitter.com/PhV62jS7BZ
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदके जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी गो फर्स्टने विशेष ऑफर दिली आहे. गो फर्स्टने पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे 2025 पर्यंत ऑलिम्पिक पदक विजेत्यांना मोफत विमानसेवा देण्याची घोषणा केली आहे. भारताने ऑलिम्पिक 2020 मध्ये 7 पदके जिंकली आहेत, ज्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. नीरज चोप्रा (भाला फेक), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), पीव्ही सिंधू (बॅडमिंटन), लवलिना बोर्गोहेन (बॉक्सिंग), पुरुष हॉकी संघ, रवी कुमार दहिया (कुस्ती), बजरंग पुनिया (कुस्ती) यांना गो फर्स्ट एअरच्या ऑफरचा फायदा मिळणार आहे.