एक्स्प्लोर
Advertisement
EPF Account ला नवीन बँक खात्याचे तपशील अपडेट करण्यास उशीर करू नका, असे करा अद्ययावत
तुमचं पीएफ खाते बँक खात्याशी लिंक असणे फार आवश्यक आहे. जुने बँक खाते बंद केल्यावर तुम्ही नवीन खाते पीएफ खात्याशी लिंक केलं नसेल तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकणार नाही.
जर तुम्ही पीएफ खात्याशी लिंक केलेले बँक खाते बंद केले असेल तर नवीन खाते पीएफ खात्याशी लिंक करण्यास विसरू नका. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) आपल्या ग्राहकांना ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी परवानगी देतो.
जुने खाते बंद केल्यावर तुम्ही नवीन खाते पीएफ खात्याशी लिंक केलं नसेल तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकणार नाही. पीएफ खात्यात बँक खात्याची योग्य माहिती असणे महत्वाचे आहे. म्हणूनच आपल्या नवीन बँक खात्याविषयीची माहिती पीएफ खात्यासह त्वरित अपेडट केली पाहिजे.
पीएफ खाते नवीन बँक खात्याशी कसे लिंक करावे?
- युनिफाइड मेंबर पोर्टल वर जा.
- यूजरनेम आणि पासवर्डने लॉग इन करा.
- मॅनेज टॅबवर क्लिक करा.
- ड्रॉप डाऊन मेन्यूमधून 'KYC' निवडा.
- यानंतर, बँक निवडा आणि बँक खाते क्रमांक, नाव आणि आयएफएससी कोड भरा आणि 'सेव्ह' वर क्लिक करा.
- माहिती नियोक्ताद्वारे मंजूर झाल्यानंतर केवायसी विभागात ही माहिती दिसेल. यासह नवीन बँक खात्याची माहिती ईपीएफ खात्यासह अद्ययावत केली जाईल.
EPFO पोर्टलवरुन EPF बॅलन्स कसा तपासावा
- www.epfindia.gov.in या संकेतस्थळावर जा
- 'Our Services' टॅब वरुन 'For Employees' पर्यारावर क्लिक करा.
- 'Services' टॅबमध्ये जाऊन 'Member Passbook' वर क्लिक करा.
- लॉगिन करण्यासाठी आपल्याला आपले UAN आणि पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल आणि आपण आपल्या पीएफ खात्याचे पासबुक पाहू शकाल.
- यासाठी आपले खाते आपल्या UAN लिंक असले पाहिजे. तसेच कर्मचाऱ्याद्वारे UAN सक्रिय असावे.
- आपण आपलं पासबुक प्रिंट करु शकता किंवा डाउनलोड करू शकता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement