विमानप्रवासात लहान मुल सोबत असेल तरी नो टेन्शन, डीजीसीआयच्या नव्या आदेशामुळे आता 'ही' चिंता कायमची मिटणार!
लहान मुलांच्या वाहतुकीबाबत डीजीसीएने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता पालकांची चिंता मिटणार आहे.
मुंबई : विमानातून प्रवास करताना सोबत लहान मूल असेल तर पालकांची मोठी पंचाईत होते. मुलाला आपल्या बाजूची जागा मिळावी यासाठी पालकांना सोईचे सिट निवडायचे असल्याच वेगळे पैसे द्यावे लागायचे. आता मात्र हे आतीरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. कारण आता नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत आता हवाई वाहतूक कंपन्यांना 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना त्याच्या पालकाच्या बाजूलाच सीट द्यावे लागणार आहे.
लहान मुलामुळे पालकांची अनेकवेळा अडचण
अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत, जेव्हा 12 वर्षांपेक्षा कमी वय असूनदेखील विमान कंपन्यांनी संबंधित मुलांना आपल्या पालकांसोबत बसण्यासाठी जागा दिलेली नाही. पालकांना मिळालेल्या सीटच्या बाजूचे सीट हवे असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागायचे. अशा स्थितीत मुलांच्या पालकांना अडचणींचा सामना करावा लागायचा. आता मात्र तसे होणार नाही. नव्या नियमानुसार विमान वाहतूक कंपन्यांना 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना त्याच्या कमीत कमी एका पालकाच्या बाजूला सीट द्यावे लागणार आहे.
डीजीसीएने काय म्हटलंय?
विमान कंपन्यांनी 12 वर्षे वय असेलेल्या छोट्या मुलाला आपल्या पालकांच्या पीएनआरसोबतच प्रवास करण्यास परवानगी द्यायला हवी. अशा मुलांना त्याच्या पालकांसोबत कमीत कमी एक सीट दिले पाहिजे. त्याची नंतर नोंद ठेवली पाहिजे, असे डीजीसीएने म्हटले आहे.
हेही वाचा :
मे महिन्यात एकूण 11 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट!
इयत्ता 8 वी पास असले तरी थेट नौदलात मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा? वाचा सविस्तर!
तो आला अन् झटक्यात करोडपती झाला, एका सेकंदात आयुष्य बदललं! वाचा नेमकं काय घडलं?