एक्स्प्लोर

Chitra Ramakrishna : चित्रा रामकृष्ण यांना सात दिवसांची सीबीआय कस्टडी

Chitra Ramakrishna in CBI Custody: दिल्ली न्यायालयाने चित्रा रामकृष्ण यांची चौकशी करण्याकरता सीबीआयला सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

Chitra Ramakrishna in Custody: नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना दिल्ली न्यायालयाने सात दिवसांची सीबीआय कस्टडी सुनावली आहे. रविवारी रात्री चित्रा यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी त्यांची चौकशी करण्याकरता सात दिवसांची सीबीआय कस्टडी सुनावली आहे. विशेष सीबीआय कोर्टाने काही दिवसांपूर्वी चित्रा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर त्यांना अटक झाली होती.

चित्रा रामकृष्ण यांच्यावर हिमालयातील एका कथित योगीच्या सूचनेवरून  काम करणे आणि संवेदनशील माहिती देण्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान दिल्ली न्यायालयात सोमवारी विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी सीबीआय आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा आदेश दिला. या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (CBI) NSE घोटाळ्याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. सात दिवस चित्रा यांना सीबीआय कस्टडी सुनावण्यात आली आहे.

सीबीआयने काही दिवसांपूर्वी एनएसईचे माज ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रम्हण्यम याला चेन्नईतून अटक केली होती. हिमालयातील योगी हा दुसरा कोणी नसून आनंद सुब्रम्हण्यम आहे, असे म्हटले जात आहे. एनएसईच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप आनंदवर आहे. एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण या आनंदच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत होत्या. सध्या आनंद सुब्रम्हण्यम सीबीआय कोठडीत आहे. 

काय आहे प्रकरण ?

चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता. 

केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने को-लोकेशन फॅसिलिटी प्रकरणात दिल्लीस्थित OPG सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि प्रवर्तक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध स्टॉक मार्केटच्या बातम्यांपर्यंत लवकर प्रवेश मिळवून नफा मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय त्याच प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि एनएसई, मुंबईचे अज्ञात अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींची चौकशी करत होते.

सेबीने  NSE ला रामकृष्ण यांच्याकडून 1.54 कोटी रुपयांचा स्थगित बोनस आणि अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले 2.83 कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित बातम्या: 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget