एक्स्प्लोर

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरभाडे भत्त्याच्या 2% दरवाढीला मंजुरी, महागाई भत्ता 60 टक्क्यांपर्यंत वाढणार

DA Hike 2026: केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढीस मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता वाढणार आहे.

HRA: नोकरी करणाऱ्या सर्वसामान्य नोकरदारसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या नोकरदारांना घरभाडे भत्ता वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करता असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात या संदर्भात निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने घरभाडे भत्ता (HRA)लागू झाल्यास मोठा एरियसही मिळू शकतो. त्यामुळे या निर्णयाने वाढत्या भाडेपट्ट्या आणि महागाई दरम्यान बचत वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे हे पाऊल वरदान ठरू शकते. दुसरीकडे, केंद्र सरकारने आज केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाची बातमी दिली आहे. सूत्रांनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA Hike 2026) दोन टक्के वाढीस मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता वाढणार आहे.

DA Hike Latest News : एकूण महागाई भत्ता 60 टक्क्यांपर्यंत वाढणार

या सरकारी निर्णयानंतर, कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता आता 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या वाढीचा थेट फायदा अंदाजे 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना होईल, ज्यामुळे त्यांच्या मासिक पगारात आणि निवृत्तीवेतनात वाढ होईल.

DA Hike : आता पगारात किती वाढ होईल?

जर एखाद्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचा मूळ पगार ₹३६,५०० असेल, तर ६० टक्क्यांनी त्यांचा महागाई भत्ता आता ₹२१,९०० होईल. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांना जानेवारीपासूनची थकबाकीही मिळणार आहे. नवीन नियम १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. याचा अर्थ असा की, कर्मचाऱ्यांना केवळ पुढच्या महिन्याचा वाढीव पगारच मिळणार नाही, तर मागील तीन महिन्यांची, म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांची, थकबाकीसुद्धा एकाच वेळी मिळेल.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे, वाढत्या महागाईच्या काळात आपल्या उत्पन्नात वाढ करण्याची मागणी करणाऱ्या आणि काही काळापासून या घोषणेची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही वाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा कर्मचारी संघटना आठव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन रचनेत मोठ्या बदलांची मागणी करत आहेत.

महागाई भत्ता का वाढवला जातो?

वाढत्या महागाईमुळे होणाऱ्या खर्चाची भरपाई करण्यासाठी, सरकार वर्षातून दोनदा, जानेवारी आणि जुलैमध्ये, महागाई भत्ता वाढवते. याची गणना कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीच्या (CPI-IW) आधारे केली जाते, ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती किती वाढल्या आहेत हे दिसून येते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, बाजारातील किमती वाढल्यामुळे, तुमच्या पगाराचे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी सरकार हा भत्ता वाढवते.

हे सुद्धा वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget