Share Market : शेअर बाजारात अस्थिरता कायम; Sensex मध्ये काहीशी घसरण, मेटल्सचे शेअर्स पाच टक्क्यांनी आपटले
Stock Market : आज मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, आरोग्य, आयटी आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते पाच टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

मुंबई: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात अस्थिरता कायम असल्याचं दिसून आलं आहे. सुरुवातीला वरती गेलेला सेन्सेक्स बाजार बंद होताना पुन्हा एकदा खाली घसरला आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 192 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 91 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.35 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,278 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.56 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,211 वर पोहोचला आहे. आज मेटल्स क्षेत्रातल्या शेअर्समध्ये तब्बल पाच टक्क्यांची घसरण झाली आहे.
आज 848 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2428 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 132 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आज बाजार बंद होताना आज मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, आरोग्य, आयटी आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते पाच टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. तर दुसरीकडे बँकांच्या शेअर्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही दोन टक्क्यांची घसरण झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Coal India, Tata Steel, ONGC, Hindalco Industries आणि JSW Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून HUL, Eicher Motors, Asian Paints, UltraTech Cement आणि IndusInd Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
आज सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स वधारला होता, त्यावेळी निफ्टी 50 मधील 31 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, उर्वरित 19 शेअरमध्ये घसरण झाल्याचं दिसलं होतं. बँक निफ्टीदेखील वधारला होता. बँक निफ्टीत 37.20 अंकाची तेजी दिसून आली होती.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Eicher Motors- 3.04 टक्के
- HUL- 3.01 टक्के
- Asian Paints- 2.70 टक्के
- IndusInd Bank- 2.37 टक्के
- UltraTechCement- 2.28 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Coal India- 7.10 टक्के
- Tata Steel- 6.98 टक्के
- ONGC- 6.25 टक्के
- JSW Steel- 4.87 टक्के
- Hindalco- 4.75 टक्के























