Share Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने केला 60 हजारांचा टप्पा पार, निफ्टीमध्येही वाढ
Stock Market Updates : ऑटो क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई: शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगलाच फायदेशीर ठरला असून या आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात शेअर बाजार वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 417 अंकांची वाढ झाली आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 119 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,260 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.67 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,944 वर पोहोचला.
सेन्सेक्सने 5 एप्रिलनंतर आज पहिल्यांदाच 60 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज शेअर बाजारात 1941 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1401 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज 119 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज शेअर बाजार बंद होताना Bajaj Finserv, Hero MotoCorp, HDFC Life, Bajaj Finance आणि Bharti Airtel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली.
आजा बाजार बंद होताना ऑटो क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.5 टक्क्यांची वाढ झाली.
रुपया वधारला
डॉलरच्या तुलनेत आज रुपया 21 पैशांनी वधारला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची आजची किंमत ही 79.65 इतकी आहे.
शेअर बाजाराची सुरुवात
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांक (Sensex) 95.84 अंकांनी वधारत 59,938.05 अंकांवर खुला झाला. एनएसईचा निफ्टी (Nifty) निर्देशांक 42 अंकांनी वधारत 17,868 अंकांवर खुला झाला.
सकाळी 9.29 वाजता सेन्सेक्स 161 अंकांनी वधारत 60,008.11 अंकांवर पोहचला होता. त्यानंतर पुन्हा खाली घसरला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 185 अंकांनी वधारत 60,027.58 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 63 अंकांनी वधारत 17,888.35 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Bajaj Finserv- 5.81 टक्के
- Hero Motocorp- 3.42 टक्के
- Bajaj Finance- 3.31 टक्के
- HDFC Life- 3.29 टक्के
- Bharti Airtel- 2.68 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- M&M- 1.09 टक्के
- Apollo Hospital- 1.00 टक्के
- Tata Motors- 0.91 टक्के
- Cipla- 0.85 टक्के
- UltraTechCement- 0.69 टक्के