Share Market: शेअर बाजारात Nifty मध्ये मोठी घसरण तर Sensex 773 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांना चार लाख कोटींची फटका
Stock Market Updates: शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रांमध्ये आज दोन टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे गुंतवणूकदारांना चार लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
नवी दिल्ली: शेअर बाजारात आज (Closing Bell Share Market Updates) गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला असल्याचं दिसून आलं. त्यामुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 773 अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 226 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 1.27 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,205 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 1.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,891 अंकांवर स्थिरावला. आज निफ्टी बँकमध्ये 1,042 अंकांची घसरण होऊन तो 41,690 अंकांवर स्थिरावला. आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना चार लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचं स्पष्ट झालंय.
आज शेअर बाजार बंद होताना (Stock Market Updates) जवळपास सर्वच क्षेत्रांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. आज बँक, पॉवर, रिअॅलिटी तसेच सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 1.5 टक्क्यांची तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.8 टक्क्याची घसरण झाली.
शेअर बाजारात आज एकूण 1106 शेअर्समध्ये वाढ झाली तर 2310 शेअर्समध्ये घट झाली. आज एकूण 129 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Closing Bell Share Market Updates: रुपयाची किंमत 13 पैशांनी वाढली
डॉलरच्या किंमतीत आज रुपयाच्या किमतीमध्ये 13 पैशांची वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 81.59 इतकी आहे. सोमवारी ही किंमत 8..72 इतकी होती.
Closing Bell Share Market Updates: शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीने झाल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुरुवातीपासून सुरू असलेली घसरण ही शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे आज मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं.
गेल्या वर्षीप्रमाणेच, या वर्षीही परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1.6 अब्ज डॉलर्सच्या शेअर्सची विक्री केली आहे.
भारतीय अर्थसंकल्प अवघ्या काहीच दिवसांवर आला असून त्याचा परिणामही भारतीय शेअर बाजारावर होताना दिसत आहे. भारतीय गुंतवणूकदारांना यंदा केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून सकारात्मक अपेक्षा आहेत.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- Maruti Suzuki- 0.98 टक्के
- Hindalco- 0.92 टक्के
- HUL- 0.84 टक्के
- Bajaj Auto- 0.84 टक्के
- Tata Steel- 0.50 टक्के
या शेअर्समध्ये घसरण झाली
- Adani Ports- 6.31 टक्के
- IndusInd Bank- 4.63 टक्के
- SBI- 4.32 टक्के
- HDFC Bank- 2.76 टक्के
- Cipla- 2.53 टक्के
ही बातमी वाचा: