Share Market : सुरुवातीच्या वाढीनंतर शेअर बाजारात घसरण; ऑटो, बँक, रिअॅलिटी क्षेत्राला फटका
Share Market : आज बँक, कॅपिटल गुड्स, एफएमजीसी, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगलीच घसरण झाली आहे.

मुंबई: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काहीसं आशादायक चित्र असताना पुन्हा अस्थिरता दिसून आली. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 561 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 168 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.97 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,302 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.97 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,118 वर पोहोचला आहे.
आज 1516 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1919 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 140 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 168 अंकांनी वधारत 58,030 अंकावर व्यवहार सुरू केला होता. तर, निफ्टी 42.50 वधारला होता.
आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Coal India- 3.26 टक्के
- Hindalco- 2.19 टक्के
- UPL- 1.84 टक्के
- ONGC- 1.23 टक्के
- HDFC Bank- 0.50 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Britannia- 3.46 टक्के
- TATA Cons. Prod- 3.08 टक्के
- Power Grid Corp- 2.98 टक्के
- Grasim- 2.90 टक्के
- UltraTechCement- 2.90 टक्क
दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांतील हा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा परिणाम होत आहे. जगभरातील शेअर बाजारावरही या युद्धाचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करायची की नाही? याबाबत संभ्रमावस्था आहे. असं असलं तरी येत्या काही काळात शेअर बाजारमध्ये पुन्हा एकदा स्थिरता येण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha























