Share Market : शेअर बाजारात घसरण सुरूच; Sensex 1030 अंकांनी घसरला, तर Nifty 17,200 जवळ
Share Market: सार्वजनिक बँका, मेटल आणि उर्जा वगळता इतर सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे.

Share Market: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1023.63 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 302 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.75 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,621.19 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.73 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,213.60 वर पोहोचला आहे.
आज 1389 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2044 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 131 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
सकाळी शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच BSE सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी घसरला. अल्पावधीत सेन्सेक्स काही वेळेसाठी सावरला. मात्र, पुन्हा घसरण सुरू झाली ती कायम राहिली. दुपारी 12.20 वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये 798.28 अंकांची घसरण दिसून आली. यावेळी सेन्सेक्स 57,851 अंकांवर ट्रेड करत होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टीमध्येही 59.85 अंकांची घसरण झाली होती.
आज बाजार बंद होताना सार्वजनिक बँक, मेटल, आणि उर्जा क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर बँक ऑटो, आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅपमध्ये 1 ते 2 टक्यांची तर आणि स्मॉलकॅपमध्येही 0.75 ते 1.25 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Tata Consumer Products, HDFC Bank, HDFC Life, L&T आणि Bajaj Finance या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Power Grid Corp, ONGC, NTPC, Shree Cements आणि Tata Steel. या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Power Grid Corp- 1.47 टक्के
- ONGC- 1.47 टक्के
- NTPC- 0.71 टक्के
- Shree Cements- 0.57 टक्के
- Tata Steel- 0.57 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- TATA Cons. Prod 3.95 टक्के
- HDFC Bank- 3.66 टक्के
- HDFC Life- 3.38 टक्के
- Larsen- 3.26 टक्के
- Britannia- 3.18 टक्के
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha























