Share Market : गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजार उसळला; Sensex 1041 अंकांनी वधारला, टायटन, इन्फोसिसला फायदा
Share Market : आयटी आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे तर इतर सर्वच क्षेत्रातले शेअर्स एक टक्क्यापर्यंत वधारले आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अस्थिर असलेला शेअर बाजार आज चांगलाच वधारला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी उसळण पाहायला मिळाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1041 अंकांनी वधारला तर निफ्टीही 308 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 1.90 टक्क्यांची वाढ होऊन तो 55,925 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.89 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,661 वर पोहोचला आहे.
आज शेअर बाजार बंद होताना आयटी, रिअॅलिटी, ऑइल अॅन्ड गॅस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. स्माॉलकॅप आणि मिडकॅपमध्येही दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. इतर सर्वच क्षेत्रातले शेअर्स एक टक्क्याहून अधिक वधारले आहेत.
आज शेअर बाजार बंद होताना 2294 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली तर 1082 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 139 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही वाढ वा घट झाली नाही.
शेअर बाजाराची सुरुवात तेजीने
शेअर बाजाराची सुरुवात आज तेजीने झाली. शेअर बाजार सुरु होताना सेन्सेक्स 623 अंकांनी वधारत 55,507 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी 175 अंकांनी वधारत 16527.60 अंकावर खुला झाला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 841.41 अंकांची तेजी दिसून आली. त्यावेळी सेन्सेक्स 55731 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांकात 265 अंकाची उसळण दिसत असून 16623 अंकाची तेजी दिसून आली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Titan Company- 4.96 टक्के
- M&M- 4.78 टक्के
- Adani Ports- 4.49 टक्के
- Infosys- 4.48 टक्के
- Larsen- 3.78 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Kotak Mahindra- 2.21 टक्के
- JSW Steel- 1.74 टक्के
- Sun Pharma- 1.73 टक्के
- Dr Reddys Labs- 0.46 टक्के
- ITC- 0.06 टक्के