Share Market: शेअर बाजारात घसरण, Nifty 16,400 वर तर Sensex 567 अंकांनी घसरला
Closing Bell Updates: रिअॅलिटी, आयटी आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची घसरण झाली आहे तर ऑईल अॅन्ड गॅसच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस चांगलाच नुकसानीचा गेला आहे. आज शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 567 अंकांनी तर निफ्टी 153 अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये आज 1.02 टक्क्यांची घसरण होऊन तो 55.107 अंकावर पोहोचला आहे तर निफ्टीही 0.92 टक्के अंकांनी घसरून तो 16,416 अंकांवर पोहोचला आहे.
आज शेअर बाजार बंद होताना 1261 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1954 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर 126 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज शेअर बाजार बंद होताना रिअॅलिटी, आयटी आणि कॅपिटल गूड्समध्ये एक टक्क्यांची घसरण झाली आहे तर ऑईल अॅन्ड गॅस तसेच उर्जा क्षेत्रातल्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याने त्याच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही अर्ध्या टक्क्याहून अधिकची घट झाली आहे.
प्री-ओपनिंगपासून घसरण
शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रापासून घसरण असल्याचे दिसून आले. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला होता. तर, निफ्टी इंडेक्समध्ये 100 अंकाच्या घसरणीसह 16500 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
आज शेअर बाजारातील बहुतांशी सेक्टरमध्ये घसरण असल्याचे चित्र आहे. निफ्टी ऑइल अॅण्ड गॅसचा शेअर निर्देशांकामध्ये तेजी दिसून आली आहे. त्याशिवाय, निफ्टी बँक, ऑटो, वित्तीय सेवा, FMCG, आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, खासगी बँक, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू आदी शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- ONGC- 5.13 टक्के
- Coal India- 1.39 टक्के
- NTPC- 1.32 टक्के
- Maruti Suzuki- 1.28 टक्के
- Hero Motocorp- 1.18 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- Titan Company- 4.45 टक्के
- UPL- 4.21 टक्के
- Dr Reddys Labs- 3.76 टक्के
- Britannia- 3.11 टक्के
- Larsen- 3.09 टक्के
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.























