Share Market : मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार सावरला, Nifty 18 हजारांच्या जवळ तर Sensex मध्ये 38 अंकांची वाढ
Stock Market Updates : रिअॅलिटी, एफएमसीजी, उर्जा आणि बँकिंग या क्षेत्रातल्या शेअर्सची खरेदी झाल्याचं दिसून आलं.
मुंबई: आज शेअर बाजारात (Share Market Updates) मोठी अस्थिरता दिसून आली. सुरुवातीला शेअर बाजारमध्ये घसरण झाल्यानंतर बाजार बंद होताना मात्र तो काहीसा सावरल्याचं चित्र आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 37 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये (Nifty) 12 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,298 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.07 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,956 अंकांवर स्थिरावला. निफ्टी बँकमध्ये आज 194 अंकांची वाढ होऊन तो 39,656 वर पोहोचला.
आज कोटक महिंद्रा कंपनीच्या शेअर्समध्ये 3.52 टक्क्यांची वाढ झाली. त्या खालोखाल लार्सेन कंपनीच्या शेअर्समध्ये 2.09 टक्क्यांची वाढ झाली. तर ओएनजीसी कंपनीच्या शेअर्समध्ये 2.94 टक्के तर डॉ. रेड्डीज लॅब्सच्या शेअर्समध्ये 2.10 टक्क्यांची घट झाली.
सलग सातव्या सत्रात शेअर बाजार वधारला आहे. आज ऑटो, आयटी आणि फार्मा शेअर्सवर दबाव असल्याचं दिसून आलं. एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्समध्ये दिवसभर तेजी असल्याचं दिसून आलं. रिअॅलिटी आणि मेटलच्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं.
शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
शेअर बाजारात सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्समध्ये (Sensex) 150 अंकांची घसरण दिसून आली होती. तर, निफ्टीमध्ये (Nifty) घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 56 अंकांच्या घसरणीसह 17,888.20 अंकांवर व्यवहार करत होता. तर, सेन्सेक्स 206 अंकांच्या घसरणीसह 60,053.71 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Kotak Mahindra- 3.52 टक्के
- Larsen- 2.09 टक्के
- TATA Cons. Prod- 1.81 टक्के
- IndusInd Bank- 1.52 टक्के
- SBI Life Insura- 1.44 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- ONGC- 2.94 टक्के
- Dr Reddys Labs- 2.10 टक्के
- UPL- 2.09 टक्के
- Wipro- 1.81 टक्के
- BPCL- 1.73 टक्के
महत्त्वाच्या बातम्या: