एक्स्प्लोर

Share Market : अमेरिकेच्या व्याजदर वाढीचा परिणाम भारतीय बाजारावर, Sensex मध्ये 337 अंकांची घसरण

Stock Market : उर्जा, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्र सोडलं तर आज सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झालेली आहे. बँक इंडेक्समध्येही एक टक्क्याची घसरण झालेली आहे. 

मुंबई : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडने त्याच्या व्याजदरात 75 अंकांची वाढ केल्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये 337 अंकांची घसरण धाली आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 88 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 0.57 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,119 अंकांवर पोहोचला तर निफ्टीमध्ये 0.50 अंकांची घसरण होऊन तो 17,629 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही आज 1.39 टक्क्यांची म्हणजे 572 अंकांची घसरण झाली असून तो 40,630 अंकावर पोहोचला. 

आज शेअर बाजार बंद होताना 1793 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1565 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तर 137 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. बँक इंडेक्समध्येही एक टक्क्याची घसरण झालेली आहे. 

आज Titan Company, HUL, Asian Paints, Eicher Motors आणि  Maruti Suzuki या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तसेच आज उर्जा, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये काहीशी वाढ झालेली आहे. 

रुपयाची 80 पार 

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असून आज सुरुच असून आज रुपयाच्या किमतीमध्ये 89 पैशांची वाढ झाली आहे. आज रुपयाची किंमत 80.86 इतकी आहे. 

फेडच्या व्याजदरात वाढ 

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी त्याच्या व्याजदरात 75 अंकांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. व्याजदरात वाढ करण्याचे संकेत या आधीच देण्यात आले होते. आता सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेतील महागाई लक्षात घेता येत्या काळातही व्याजदरात वाढ होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्याचा परिणाम आता जगभरातील शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं आहे. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली 

  • Titan Company- 2.66 टक्के
  • HUL- 2.64 टक्के
  • Asian Paints- 2.38 टक्के
  • Eicher Motors- 1.81 टक्के
  • Maruti Suzuki- 1.66 टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली 

  • Power Grid Corp- 3.06 टक्के
  • Axis Bank- 2.15 टक्के
  • HDFC Bank- 2.13 टक्के
  • Coal India- 1.94 टक्के
  • HDFC- 1.76 टक्के

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget