Share Market : शेअर बाजारात घसरण सुरूच, Nifty 16125 वर तर Sensex मध्ये 236 अंकांची घसरण
Stock Market : आयटी, फार्मा, एफएमसीजी, उर्जा आणि रिअॅलिटी सेक्टरमधील शेअर्समध्ये एक टक्क्याची घसरण झाली आहे.

मुंबई: शेअर बाजारात अस्थिरता कायम असून या आठवड्यातील दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 236 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 89 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.43 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,052 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.55 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,125 वर पोहोचला आहे.
आज 1005 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2220 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 121 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना आयटी, फार्मा, एमएमसीजी, उर्जा आणि रिअॅलिटी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्याची घसरण झाली आहे. BSE मिडकॅपमध्ये 0.8 टक्के तर स्मॉलकॅपमध्ये एक टक्क्यांची घसरण झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Dr Reddy’s Labs, Kotak Mahindra Bank, HDFC, Nestle India आणि HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली असून Divis Labs, Tech Mahindra, Grasim Industries, Hindalco Industries आणि HUL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Dr Reddys Labs- 1.69 टक्के
- Kotak Mahindra- 1.53 टक्के
- HDFC- 1.42 टक्के
- HDFC Bank- 1.15 टक्के
- Nestle- 1.13 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Divis Labs- 6.06 टक्के
- Tech Mahindra- 3.90 टक्के
- Grasim- 3.75 टक्के
- Hindalco- 2.99 टक्के
- HUL- 2.95 टक्के
शेअर बाजाराची सुरुवात
आज व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी सुरुवातीला सेन्सेक्समध्ये काहीशी तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 109 अंकाची वाढ झाली तर निफ्टीदेखील 35 अंकाने वधारत 16248 वर व्यवहार करत होता. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक खरेदीचे संकेत देत होते. त्यानंतर मात्र, पुन्हा घसरण सुरू झाली.























