Share Market : शेअर बाजारात घसरण सुरूच, Nifty 16 हजारांवर, Sensex 303 अंकांनी घसरला
Stock Market : बँक क्षेत्र सोडलं तर ऑइल अॅन्ड गॅस, मेटल, फार्मा, रिअॅलिटी, कॅपिटल गुड्स आणि आयटी इंडेक्स हे 1-3 टक्क्यांनी घसरले आहेत.

मुंबई: या आठवड्यातील सलग तिसऱ्या सत्रामध्ये शेअर बाजारातील घसरण सुरूच आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 303 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 99 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.56 टक्क्यांची घसरण होऊन तो 53,749 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.62 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,025 वर पोहोचला आहे. आज 696 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2548 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 109 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
जागतिक स्तरावर नकारात्मक संकेत आणि वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी जगभरातील बँकांनी त्यांच्या व्याजदरात केलेल्या वाढीचा फटका जगभरातील शेअर बाजारांना बसतोय. भारतीय शेअर बाजारामध्येही त्यामुळे अस्थिरता निर्माण झाल्याचं दिसून येतंय.
आज बँकिंग क्षेत्र सोडलं तर ऑइल अॅन्ड गॅस, मेटल, फार्मा, रिअॅलिटी, कॅपिटल गुड्स आणि आयटी इंडेक्स हे 1-3 टक्क्यांनी घसरले आहेत. BSE मिडकॅप 1.9 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅपमध्ये 2.9 टक्क्यांची घसरण झाली आहे.
बुधवारी शेअर बाजारात Asian Paints, Adani Ports, Divis Labs, UPL आणि TCS या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून NTPC, HDFC Life, SBI Life Insurance, HDFC आणि Bharti Airtel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
सुरुवात चांगली पण...
प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स जवळपास 200 अंकांनी वधारला होता. सिंगापूर SGX निफ्टी 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 16,151 अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजार सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी मजबूत झाला. सकाळी 09.20 वाजता, सेन्सेक्स 274.35 अंकानी (0.51 टक्के) वधारून 54,320 अंकाच्या आसपास व्यवहार करत होता. NSE निफ्टी देखील 93.25 अंकानी (0.59 टक्के) वधारत 16,215 अंकाच्या आसपास व्यवहार करत होता. प्री-ओपनिंगमध्ये बाजार तेजीत होता. मात्र, त्यात पुन्हा घसरण झाली.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- NTPC- 3.91 टक्के
- HDFC Life- 2.93 टक्के
- SBI Life Insurance- 2.11 टक्के
- Bharti Airtel- 1.47 टक्के
- HDFC- 1.39 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Asian Paints- 8.06 टक्के
- Adani Ports- 5.88 टक्के
- Divis Labs- 3.89 टक्के
- TCS- 3.66 टक्के
- UPL- 3.60 टक्के























