(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market: युद्धाच्या सावटातून बाजार सावरतोय! Sensex 1223 अंकांनी तर Nifty 331 अंकांनी वधारला
Share Market: आज मेटल क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रामध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
Share Market: रशिया-युक्रेन युद्धाच्या सावटातून शेअर बाजार काहीसा सावरताना दिसत असून आज सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजार वधारला आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1,223 अंकांनी वाढला तर निफ्टीही 331 अंकानी वाढला आहे. सेन्सेक्समध्ये 2.29 टक्क्यांची वाढ होऊन तो 54,647 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 2.07 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,345 वर पोहोचला आहे.
आज 2585 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 681 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 90 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज शेअर बाजार बंद होताना मेटल क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Asian Paints, Reliance Industries, Bajaj Finance, M&M आणि IndusInd Bank आणि HUL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून Shree Cements, Power Grid Corporation, ONGC, NTPC आणि Coal India या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Asian Paints- 5.56 टक्के
- Reliance- 5.31 टक्के
- Bajaj Finance- 5.04 टक्के
- M&M- 4.88 टक्के
- IndusInd Bank- 4.12 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Shree Cements- 2.74 टक्के
- ONGC- 2.07 टक्के
- Power Grid Corp- 2.00 टक्के
- NTPC- 1.68 टक्के
- Coal India- 1.32 टक्के
आज शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 369 अंकांनी वधारल्यानंतर 53793 अंकावर सुरू झाला. निफ्टीमध्ये 65 अंकांची किंचिंत तेजी दिसून आली. त्यानंतर 16078 वर ट्रेडिंग सुरुवात केली. आज बाजारात शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये काहीशी घसरण झाली होती. त्यानंतर बाजार सावरला आणि वधारण्यास सुरुवात झाली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha