Share Market : शेअर बाजारात वाढ, Nifty 16340 वर तर Sensex 246 अंकांनी वधारला
Stock Market Updates : एकीकडे रुपयाची घसरण सुरू असली तरी शेअर बाजारामध्ये मात्र वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

मुंबई : शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाल्याचं दिसू झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 246 अंकांची वाढ झाली आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 62 अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.45 टक्क्यांची वाढ झाली होऊन तो 54,767 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.38 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,340 अंकांवर पोहोचला आहे. आज शेअर बाजारातील 1961 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1260 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आज 143 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
आज शेअर बाजार बंद होताना Axis Bank, M&M, IndusInd Bank, UltraTech Cement आणि Apollo Hospitals या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तर ONGC, Nestle India, HDFC Life, HCL Technologies आणि Tata Consumer Products या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली आहे.
क्षेत्रांचा विचार करता आज ऑईल अॅन्ड गॅस आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तसेच रिअॅलिटी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं.
रुपया घसरला, किंमत 80 च्या पार
गेल्या काही दिवसांपासून रुपयाची किंमत सातत्याने घसरत असून आज डॉलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 80 च्या पार गेला आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत विक्रमी 80.01 वर पोहोचली आहे. रुपयाची किंमत सातत्याने घसरत असून त्याचा फटका आयातीच्या खर्चावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याची शक्यत आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Axis Bank- 2.35 टक्के
- IndusInd Bank- 2.00 टक्के
- M&M- 1.96 टक्के
- Apollo Hospital- 1.85 टक्के
- UltraTechCement- 1.73 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- ONGC- 1.54 टक्के
- Nestle- 1.33 टक्के
- HDFC Life- 1.26 टक्के
- HCL Tech- 1.18 टक्के
- TATA Cons. Prod- 0.89 टक्के























