Share Market: शेअर बाजारात अस्थिरता कायम, बँकिंग क्षेत्र सोडले तर सर्व क्षेत्रात घसरण
Share Market : बँकिंग क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातील शेअर्सच्या किंमतीत आज एक ते दोन टक्क्यांची घसरण झाली आहे.
मुंबई: रशिया-युक्रेन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात अस्थिरता कायम असल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 149 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 69 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.26 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,683 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,206.70 वर पोहोचला आहे. आज 678 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2693 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 116 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना बँकिंग क्षेत्र सोडलं तर ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी यासह सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाली. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.8 ते 2.2 टक्क्यांची घसरण झाली आहे.
सोमवारी शेअर बाजारात Coal India, Hindalco, UPL, ONGC आणि Adani Ports या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Wipro, Infosys, Shree Cements, Power Grid Corp आणि ICICI Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Wipro- 1.48 टक्के
- Infosys- 1.39 टक्के
- Shree Cements- 1.35 टक्के
- Power Grid Corp- 1.25 टक्के
- ICICI Bank- 0.74 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Coal India- 3.65 टक्के
- Hindalco- 3.32 टक्के
- UPL- 2.87 टक्के
- ONGC- 2.68 टक्के
- Adani Ports- 2.25 टक्के
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha