Share Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये घसरण, Sensex 143 अंकांनी घसरला, बँक, ऑटोच्या शेअर्समध्ये घसरण
Share Market: आज मार्केट बंद होताना सार्वजनिक बँका आणि रिअॅलिटी सेक्टरमध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मेटलच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Share Market : सार्वजनिक बँका, ऑटो आणि रिअॅलिटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 143.20 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 43.90 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.24 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,644.82 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,516.30 वर पोहोचला आहे.
आज 1554 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1704 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 87 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, रिअॅलिटी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मेटलच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली आहे. BSE मिडकॅप इंडेक्स 0.68 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही 0.45 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Hero MotoCorp, SBI, NTPC, HDFC Life आणि M&M या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Hindalco Industries, ONGC, Sun Pharma, Asian Paints आणि Divis Labs या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
Hindalco- 2.44 टक्के
ONGC- 1.25 टक्के
Sun Pharma- 1.18 टक्के
Asian Paints- 1.00 टक्के
Divis Labs- 0.99 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
Hero Motocorp- 2.15 टक्के
SBI- 1.81 टक्के
NTPC- 1.79 टक्के
M&M- 1.69 टक्के
HDFC Life- 1.58 टक्के
सकाळी पडझडीला सुरुवात
शेअर बाजारातील व्यवहार आज घसरणीसह सुरू झाला. सकाळी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 200 अंकांची घसरून होऊन तो 58,581 वर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 17,492 अंकांवर व्यवहार करत होता. ऑटो आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. घसरणीनंतर पुन्हा सावरण्यासाठी सेन्सेक्स आणि निफ्टीतील कंपन्यांना संघर्ष करावा लागत होता.
अमेरिकन शेअर बाजारातील घसरण काही प्रमाणात थांबल्यानंतर आशियाई बाजारदेखील सावरला. अॅपलने तिमाही निकालात विक्रमी विक्री केली असल्याचे जाहीर केले. तासाभरानंतर अॅपलचे शेअर पाच टक्क्यांनी वधारले.























