मुंबई: रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू करताच त्याचा परिणाम भारतासह जगभरातील शेअर मार्केटवर झाल्याचं पहायला मिळालं आहे. शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून दलाल स्ट्रीटवर हाहाकार माजला आहे. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 2,702.15 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 815.30 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 4.72 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,529.91 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 4.78 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,248 वर पोहोचला आहे. 


आज केवळ 240 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 3084 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 69 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. निफ्टीमधील सर्वच क्षेत्रामध्ये 3 ते 8 टक्क्यांची तर BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. 


मार्च 2020 नंतर सर्वात मोठी घसरण
शेअर बाजारामध्ये आज झालेली घसरण ही 23 मार्च 2020 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. प्राथमिक अंदाजानुसार, भारतीय शेअर बाजारात आजा गुंतवणूकदारांचे जवळपास 10 लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Tata Motors- 10.28 टक्के

  • UPL- 8.10 टक्के

  • IndusInd Bank- 7.89 टक्के

  • Grasim- 7.51 टक्के

  • JSW Steel- 7.38 टक्के


संबंधित बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha