Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर रशियन फौजांनी जोरदार हल्ला केला. युक्रेनची राजधानी कीववरदेखील रशियाने हल्ला केला. डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार सुरू केला आहे.
युक्रेनच्या सैन्याने रशियन हवाई दलाला झटका दिला आहे. रशियाची पाच विमाने पाडली असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. युक्रेनने नागरी विमानांसाठी हवाई वाहतूक बंद केली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाची परिस्थिती सांगणारी काही छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रशियाने हल्ला केल्यानंतर कीवमध्ये गोंधळाची स्थिती आहे. शहर सोडून जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. मेट्रो स्थानकाबाहेर नागरीक भावूक होऊन एकमेकांचा निरोप घेत आहेत.
कीव शहरातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली असल्याचे दिसून आले.
रशियाच्या हवाई दलाने युक्रेनवर एअर स्ट्राइक सुरू केला. युक्रेनच्या हद्दीत शिरलेल्या रशियन लढाऊ विमाने असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
युक्रेनमध्ये होत असलेल्या एअर स्ट्राइकमुळे राजधानी कीवमध्ये सायरन वाजवण्यात आले.
रशियन सैन्याने बेलारूसच्या सीमेतून युक्रेनमध्ये प्रवेश केला असल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आला आहे.
रशियन हवाई दलाकडून युक्रेनच्या विमानतळांना लक्ष्य करण्यात येत आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला इशारा देताना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. युक्रेनवर रशिया करत असलेल्या कारवाई कोणत्याही देशाने हस्तक्षेप त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा पुतीन यांनी दिला. युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे वृत्त 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :