Jalgaon Gold Price Hike : रशियाने युक्रेनवर (Russia-ukarine) केलेल्या हल्ल्याच्या वृत्तामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी (Gold Price Hike) पाहायला मिळत आहे. अशातच जळगाव नगरीत आज सोन्याचे दर विक्रमी पातळी वर जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात तणाव निर्माण झाल्याने जगभरात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ झाली असल्याचं दिसून आले आहे. जाणून घ्या सविस्तर


जळगावात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ


जगभरात आधीच  महागाई वाढली आहे आणि आता कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात तणाव निर्माण झाल्याने जगभरात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ झाली असल्याचं दिसून आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावातही सोन्याच्या दरात उसळी पाहयला मिळाली. जळगाव नगरीत आज सोन्याचे दर जीएस टी सह प्रति 10 ग्रॅम 53500 पर्यंत जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे


गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दराचा चढता आलेख


जळगावातील संचालक कांतीलाल जैन यांनी सांगितले,  सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात ही गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दराचा चढता आलेख असल्याचं पाहायला मिळालं होते. मात्र कालपासून या दोन्ही देशात युद्धात सुरू झाल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या बाजार पेठेवर झाला आहे, तर ग्राहक वैशाली बोरकर म्हणतात,  सोन्याच्या दरात झालेली ही सोन्याची दर वाढ सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने आवाक्याबाहेर असल्याने ग्राहकांना ही वाढ परवडणारी नसल्याचं म्हटलंय.


सोने प्रति 10 ग्रॅम 60,000 रुपयांपर्यंत भाव वाढू शकतात
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1935 डॉलरच्या पुढे गेला आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये (MCX) वर सोन्याच्या किमती 1400 रुपये प्रति ग्रॅमने वाढल्या असून सोन्याचा भाव 51,750 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. किंबहुना, जागतिक तणावामुळे सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे.कच्च्या तेलाने प्रति बॅरल 100 डॉलरचा टप्पा ओलांडला तर त्यासोबतच सोन्याच्या किंमतीही भडकल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल,असे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, सोने लवकरच 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते. 


सोने महाग का होत आहे?
जगभरात आधीच  महागाई वाढली आहे आणि आता कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर विविध देशांच्या केंद्रीय बँका महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढवू शकतात. यानंतर आरबीआयकडूनही (RBI) व्याजदर वाढवण्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत शेअर बाजारात घसरण दिसू शकते, त्यानंतर गुंतवणूकदार आपली गुंतवणूक वाचवण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करू शकतात.त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: