Russia Ukraine War and Stock Market : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणासोबत अर्थकारणावरही उमटू लागले. आज सकाळीच रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजार कोसळला. बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1,600 अंकांनी घसरला. ही घसरण 2000 अंकांपर्यंत गेली होती. आज झालेल्या पडझडीत जवळपास 10 लाख कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारावर युद्धाच्या तणावामुळे विक्रीचा दबाव आहे. 


सात दिवसात गुंतवणूकदारांना मोठा फटका 


काल, बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप  256 लाख कोटी इतके होते. आज बाजार घसरल्यानंतर तो 246 कोटी रुपयांच्या खाली आला आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. युक्रेन आणि रशियामधील वाद वाढल्याने आज सलग सातव्या दिवशी बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. मागील सात  दिवसांत गुंतवणूकदारांचे 16 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 


रशियन शेअर बाजारात सुनामी, व्यवहार स्थगित


रशियातील शेअर बाजारांची स्थितीही वाईट आहे. रशियन शेअर बाजार विक्रमी उच्चांकावरून 30 टक्क्यांनी घसरला होता. आज झालेल्या जोरदार विक्रीमुळे रशियन शेअर बाजारांवर व्यवहार ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली होती. रशियाच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाचे दरही वधारले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति डॉलर इतका झाला. मागील सात वर्षातील हा उच्चांकी दर आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha